अखंडीत विज पुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 02:34 PM2020-03-26T14:34:08+5:302020-03-26T14:36:23+5:30

नाशिक: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. मात्र, विजेबाबतच्या तक्रारी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन न करता हेल्पलाईनवरच कराव्या असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांनी केले आहे.

Deployment staff of Mahavidyar deployed for uninterrupted power supply | अखंडीत विज पुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी तैनात

अखंडीत विज पुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी तैनात

googlenewsNext
ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेची व्यवस्थायंदा बिल मिळणार नाही

नाशिक: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. मात्र, विजेबाबतच्या तक्रारी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन न करता हेल्पलाईनवरच कराव्या असे आवाहन महावितरणच्यानाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर यांनी केले आहे.

जमावबंदीच्या कालावधीतही सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. प्रशासकीय कार्यालयांत पाच टक्के उपस्थितीची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी प्रामुख्याने अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी (जनमित्र, यंत्रचालक) सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी मास्क, लिक्विड हॅण्डवॉश, सॅनेटायझर याचा सातत्याने वापर करण्याचे सुचित करण्यात आले आहे. यासोबतच दुरु स्तीच्या कामासाठी जाताना अभियंता व जनिमत्रांनी स्वत:चे ओळखपत्र सोबत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो तत्परतेने पूर्ववत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

महावितरणकडून सोमवार (दि.२३) पासून वीजिबलांची छपाई व वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत छपाई सुरु होईपर्यंत वीजग्राहकांना वीजिबल मिळणार नाहीत. तसेच वीजमीटरचे रिडींग सुद्धा घेण्यात येणार नाही. मात्र महावितरणच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर वीजिबल उपलब्ध आहेत. यासोबतच महावितरणकडे मोबाईल क्र मांक रजिस्टर्ड केलेल्या वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजिबलाची माहिती पाठविण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित झाला असल्यास किंवा अन्य महत्वाची तक्र ार किंवा माहिती देण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ, अँप्स येथे महावितरणच्या स्थानिक पातळीवर उपलब्ध १८००१०२३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्र मांकावर काल करावे असे आवाहन जनवीर यांनी केले आहे.

Web Title: Deployment staff of Mahavidyar deployed for uninterrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.