२७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

By admin | Published: March 6, 2017 12:27 AM2017-03-06T00:27:08+5:302017-03-06T00:27:19+5:30

येवला : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील पाच गट व दहा गणांत निवडणूक लढवीत असलेल्या ६४ पैकी २७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

The deposit amount of 27 candidates has been seized | २७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

२७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

Next

येवला : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील पाच गट व दहा गणांत निवडणूक लढवीत असलेल्या ६४ पैकी २७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
गटाच्या पाच जागांसाठी १९ उमेदवार, तर पंचायत समिती गणांच्या दहा जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. यात अनेकांचा धक्कादायक पराभव झाला असून, काहीना तर अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाली. तब्बल ४२ टक्के उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याने त्यांना आपली अनामत रक्कमदेखील वाचवता आलेली नाही. ज्याचा पक्षाशी संबंध नाही अशा उमेदवारांना कुठलाही प्रवेश न करता भाजपा व कॉँग्रेसने उसनवारीने उमेदवारी दिली होती. त्यामुळे निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या कमी होती. हे सगळेच मुख्य उमेदवार नसल्याने मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे मतदानाच्या आकडेवारीत समजते. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून उमेदवारी करत अंदरसूल गटातील बाबासाहेब डमाळे, नागडे गणातील दादा मोरे व मुखेड गणातील सोनाली शिंदे या भाजपाच्या तीन तर पाटोदा गणातील आशालता पाटील व चिचोंडी गणातील लक्ष्मी गोसावी या कॉँग्रेसच्या उमेदवारांनी अधिक मते मिळवत आपली अनामत रक्कम वाचवण्यात यश मिळविले आहे. मात्र बाकींची अनामत रक्कम शासन तिजोरीत जमा झाली आहे.
कॉँग्रेसचे अनामत रक्कम जप्त झालेले उमेदवार व त्यांना मिळालेले मते पुढीलप्रमाणे- पाटोदा गटातील उस्मान शेख (२४५७), राजापूर गट- भारती पुणे (४६१), अंदरसूल गट-रावसाहेब लासुरे (४४९), मुखेड गट- संगीता अहेर (१३२१), तर गणांतील उमेदवार पुढीलप्रमाणे- धुळगाव गणातील सूर्यकांत गोसावी (६२९), राजापूर गण- आशा झाल्टे (२५५), अंदरसूल गण- शिवाजी धनगे (८४८), नागडे गण- मीरा माळी (१९०), मुखेड गण- छाया दिवटे (३३०) यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. मागेल त्याला उमेदवारी हा अजेंडा वापरला; मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रि येत पक्षाकडे कोणीही लक्ष न दिल्याने तालुक्यात कॉँग्रेसला एकही जागा मिळविात आली नाही. मात्र बऱ्याच उमेदवारांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली.
बसपाचे अनामत जप्त झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेले मते)े -
धुळगाव गणातून विक्रांत गायकवाड (२०९), नगरसूल गण- धर्मा पगारे (१७२), राजापूर गण- कांताबाई पगारे (३०२), चिचोंडी गण- अर्चना सोनवणे (३०४) या उमेदवारांचा समावेश आहे.
अनामत जप्त झालेले अपक्ष
उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते) राजापूर गट- रेन्ना तांबोळी (१४७), तर गणातून धुळगाव गण- बाबासाहेब पवार (२७५), सायगाव गण- तान्हुबाई गायकवाड (३०९), नागडे गण- संतोष निकम (२३४), मुखेड गण- वैशाली वेळंजकर (१३७) यांच्यावर अनामत जप्तीची नामुष्की ओढावली आहे. (वार्ताहर)

Web Title: The deposit amount of 27 candidates has been seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.