२९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
By admin | Published: March 7, 2017 12:42 AM2017-03-07T00:42:08+5:302017-03-07T00:42:17+5:30
चांदवड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील चार गटांत व आठ गणांतून निवडणुकीत उभ्या असलेल्या ६५ पैकी २९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे
चांदवड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील चार गटांत व आठ गणांतून निवडणुकीत उभ्या असलेल्या ६५ पैकी २९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तालुक्यातील चार गटांत २० उमेदवार उभे होते. त्यापैकी १० जणांची, आठ गणांतील ४५ पैकी १९ उमेदवारांना आपली अनामत रक्कम गमवावी लागल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे व तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांनी दिली.
तळेगाव रोही गटातील अपक्ष उमेदवार राजेंद्र रामदास दवंडे, मधुकर कारभारी टोपे, तळेगाव रोही गणातील गीता रावसाहेब झाल्टे, अॅड. कल्पना नीळकंठ निंबाळकर, वाहेगावसाळ गणातील महेश अरुण न्याहारकर, अनिल रामकृष्ण काळे, अजय भागवत जाधव, प्रकाश सुकदेव ठोंबरे, वडाळीभोई गटातून रूपाबाई कैलास केदारे, अनुसया हिरामण बोढारे, वडनेरभैरव गटातून सुनीता सोमनाथ वाघ, धोडंबे गणात अर्चना मधुकर खरे, अनसूया विठ्ठल भवर, वडनेरभैरव गणातून योगेश रामकृष्ण शिरसाठ या अपक्ष उमेदवारांची अनामत जप्त झाली. त्याचबरोबर शिवसेनेचे दुगाव गटातील राजेंद्र कारभारी सोमवंशी, दुगाव गणातील सुलोचना बाबाजी गांगुर्डे, तळेगाव रोही गटातील शांताराम दगू ठाकरे, वाहेगावसाळ गणातील भाऊसाहेब देवराम शिंदे या चार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. भाजपाचे वडाळीभोई गणातील साहेबराव बाळू गुंजाळ यांच्यावरही अनामत जप्तीची नामुष्की आली.
मनसेच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात मनसेचे तालुकाप्रमुख संपतबाबा वक्टे हे वडनेरभैरव गणातून उभे होते, तर तळेगाव रोही गणातील लीलाबाई हरिभाऊ गोजरे, वाहेगावसाळ गणातील आनंदा इंद्रभान मंडलिक, धोडंबे गणातील सुरेखा नितीन माळी या उमेदवारांची अनामत जप्त झाली. रिपाइंचे राजेंद्र लक्ष्मण गांगुर्डे दुगाव गटातून उभे होते. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.
माकपाच्या दुगाव गणातील ताईबाई छबू पवार, वडाळीभोई गटात अलका गवारे, वडनेरभैरव गटात संगीता महाले, धोडंबे गणात चित्रा गायकवाड, वडनेरभैरव गणात सुरेश गांगुर्डे यांची अनामत रक्कम जप्त झाली. (वार्ताहर)