छापील वीज बिल भरणा पावती होणार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 01:26 AM2019-09-17T01:26:38+5:302019-09-17T01:26:56+5:30

: ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीज बिल भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितरणची छापील पावती हद्दपार होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बिलभरणा झाल्याची खात्रीदेखील करून घेता येणार आहे.

 Deposit will be receipt for payment of printed electricity bill | छापील वीज बिल भरणा पावती होणार हद्दपार

छापील वीज बिल भरणा पावती होणार हद्दपार

googlenewsNext

नाशिक : ग्राहकांच्या सुविधेबरोबरच काटकसरीच्या धोरणाचा भाग म्हणून आता ग्राहकांना वीजबिल भरणा केल्याची छापील पावती न मिळता संगणकीय प्रिंटआउट मिळणार आहे. यामुळे महावितरणची छापील पावती हद्दपार होणार आहे. नवीन मिळणाऱ्या पावतीवरील क्रमांकाच्या आधारे बिलभरणा झाल्याची खात्रीदेखील करून घेता येणार आहे.
नाशिक परिमंडळातील नाशिक शहर १ व १ आणि मालेगाव या विभागासह हा उपक्र म राज्यातील २५ शहरी विभागांमध्ये सोमवार, दि. १६ पासून अंमलात येणार असून, याचा शुभारंभ नाशिकरोड येथील विद्युत भवनच्या आवारात असलेल्या दत्ताजी देशमुख पतसंस्थेच्या वीज बिल भरणा केंद्रावर करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते ग्राहकाला नवीन स्वरूपातील पावती देऊन औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्य औद्योगिकसंबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, वरिष्ठ व्यवस्थापक दिनकर मंडलिक, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, व्यवस्थापक मंगेश गाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन आदी उपस्थित होते.
वीज बिल भरणा करणाºया ग्राहकांना आता संगणकीकृत क्र मांक असणाºया पावत्या कोºया कागदावर छापून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना हा संगणकीकृत क्र मांक वापरून महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाइल अ‍ॅपवर वीज बिल भरल्याची खात्री करता येईल. सोबतच वीज बिल भरणा केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइलवर याचा संदेश सुद्धा प्राप्त होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी भरणा पावतीवर संगणकीकृत क्र मांक असल्याची खातरजमा करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, छापील स्वरूपातील पावत्या बाद करण्यात आल्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी हस्तलिखित पावत्या नाकाराव्यात व यासंदर्भात नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणाचा वाचणार खर्च
महावितरणने शहरात अनेक ठिकाणी वीज बिल भरणा केंद्रांना मान्यता दिली असून, त्यामध्ये खासगी बॅँकाचाही समावेश आहे. महावितरणच्या जागेतदेखील काही खासगी संस्थांची वीज बिल भरणा केंद्रे सुरू आहेत.
या केंद्रामधून ग्राहकांना महावितरणचा लोगो, कंपनीचे नाव आणि संदर्भित माहिती असलेली छापील स्वरूपातील भरणा बिल दिले जात होते. आता अशी छापील बिले बंद होणार असून, साध्या कागदावर संगणकीकरण पावती ग्राहकांच्या हाती पडणार आहे. यामुळे बिल छपाईवर होणारा महावितरणचा खर्च वाचणार आहे.

Web Title:  Deposit will be receipt for payment of printed electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.