उदासीन यंत्रणा : सौर ऊर्जेवर चालणाºया रिक्षा बनविणाºया नाशिकच्या युवकाची परवड हे स्टार्ट अप की ‘पॅक अप’ इंडिया?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:31 AM2017-12-13T01:31:47+5:302017-12-13T01:33:12+5:30
देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे.
नाशिक : देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे. सौर ऊर्जेवर चालणाºया आॅटो रिक्षा तयार करणाºया नाशिकच्या युवकाला या उदासीन यंत्रणेमुळे स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य होत नाही आणि संशोधनही शक्य होत नसल्याने सरकारी भरवशावर काय प्रगती करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंकुश मागजी असे या युवकाचे नाव! अवघ्या ३२ वर्षांचा या नाशिककर तरुणाने गेल्या पाच वर्षांत सौर ऊर्जेवर विविध प्रकारचे संशोधन करून दुचाकीपासून तीनचाकीपर्यंत इंधनाशिवाय ग्रीन एनर्जीतून धावायला लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर व्यावसायिक स्तरावर तयार केलेल्या चेतक आणि सौर मित्र या दोन प्रकारच्या १९ रिक्षा विविध राज्यात विकल्या गेल्या आहेत, परंतु त्यासाठी त्याला स्वत:चा कायदेशीर उद्योग मात्र सुरू करता आलेला नसून केवळ मित्राच्या उद्योगाच्या नावाने हा उद्योग किती दिवस करणार? असा प्रश्न अंकुशपुुढे निर्माण झाला आहे. अंकुश मागजी याचे खरे तर तांत्रिक शिक्षण झालेले नाही. पारंपरिक शिक्षण अवघे अकरावीपर्यंत. परंतु तरीही काहीतरी शोध घेण्याच्या आणि धडपड्या वृत्तीमुळे त्याने सौर ऊर्जेवर चालणाºया वाहनांसाठी वाहून घेतले आहे. सातवीत असतानाच एका रिक्षाच्या मागून निघणाºया धुरामुळे इंधनाला वेगळा पर्याय नसेल काय? या प्रश्नाने त्याला अनेक बाबींचा शोध घेण्यास भाग पडले. मग, शोध आणि अभ्यासाअंती ग्रीन पेट्रोल किंवा इंधनाचे अनेक पर्याय पुढे आले. त्यातून त्याने ‘सौर ऊर्जा’ हा विषय निवडला. २०१० मध्ये त्याने सोलर वॉटर हिटर, सोलर एनर्जी या विषयांवर काम केले. त्यांनतर त्यांनी सौर ऊर्जेवर चालणाºया दुचाकींवर काम सुरू केले त्यात त्याला यश आले. आर्थिक तुलनाच केली, तर पारंपरिक दुचाकीपेक्षा पाच रुपयांत ६० किलोमीटर धावणारी हा शोध खूपच क्रांतिकारी ठरू शकतो, असे अंकुशला वाटले. मग त्याने रिक्षांकडे लक्ष पुरवले. साचा तयार करून घेण्याचे काम मित्राच्या उद्योगात करून नंतर जमेल त्या साधनांचा जुगाड करीत त्याने रिक्षा तयार केली. त्यासाठी खास आकाराची पॅनल्सलाही तयार केली. पुढे संशोधनासाठी आर्थिक मदतीची गरज भासू लागल्यानंतर बॅँक आॅफ महाराष्टÑकडे मदत मागितली. बॅँकेने पाच लाख रुपयांचे साहाय्य केले, जे पुरसे नव्हते परंतु तरीही त्यातून बरेच काम झाले. प्रयोग यशस्वी ठरल्यांनतर २०१४ मध्ये त्याने केंद्र सरकारकडे उद्योगासाठी अर्ज केला. ९ आॅक्टोबर २०१५ रोजी त्याला उद्योग परवाना मिळाला आणि १ मार्च २०१६ रोजी त्याने पहिली रिक्षा रस्त्यावर आणली. स्थानिक पातळीवर रिक्षाचालकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने आॅनलाइनवरून विक्रीची व्यवस्था केली. त्याला बाहेरील राज्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला आणि विशाखापट्टणमचा एक ग्राहक मिळाला. पुढे एकेक करीत तब्बल १९ रिक्षांची विक्री झाली असून, त्यात विशाखापट्टणमबरोबरच कोलकाता, विजयवाडा, अहमदाबाद येथील ग्राहकांनी प्रतिसाद दिला.