एनआरसी विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:01 PM2020-01-24T22:01:37+5:302020-01-25T00:35:38+5:30

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद आंदोलनात येथील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील यांना निवेदन सादर केले.

Deprivation front against NRC | एनआरसी विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा

मालेगावी एनआरसी व सीएए विरोधात काढण्यात आलेला मोर्चा.

Next
ठळक मुद्देमालेगाव : अपर जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चेकऱ्यांतर्फे निवेदन

मालेगाव : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद आंदोलनात येथील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे यांनी कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील यांना निवेदन सादर केले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. नोटबंदी, जीएसटीसारखे कर जनतेला विश्वासात न घेता करण्यात आले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणून देशवासीयांना वेठीस धरले जात आहे. याच्या निषेधार्थ मालेगावी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला एकात्मता चौकातून प्रारंभ झाला. मोर्चा कॅम्परोडमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी अपर जिल्हाधिकारी राऊत यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भारिप बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हसदे यांनी नीलेश केदारे, किरण मगरे, सगीर अहमद, बबलू केदारे, लतीफ खान आदींच्या शिष्टमंडळासह कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मोर्चात किरण खरे, रवींद्र ढोडरे, बिपीन पटाईत, मौलाना उमरैन, मुकीम मीनानगरी, संतोष अहिरे, मनोहर अहिरे, रूपेश पटाईत, आकाश सुखाडे, रोशन अहिरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आठवडे बाजार सुरळीत
शहरात शुक्रवारी आठवडे बाजार भरत असतो. मोर्चा कॅम्प भागात असल्यामुळे बाजारपेठेवर कुठलाही परिणाम झाला नाही. तसेच
या बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कॅम्प पोलिसांनी मोर्चा काळात बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Deprivation front against NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप