जिवंत माणसे मृत दर्शवून अनुदानापासून ठेवले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:14 AM2021-07-27T04:14:32+5:302021-07-27T04:14:32+5:30

- ग्रामसभेत ठराव करून सात माणसांना कागदोपत्री ‘मारले’ - दीड वर्षानंतर प्रकार उघडकीस - दोषींवर त्वरित कारवाईची मागणी नांदूरशिंगोटे ...

Deprived of grants by showing living dead | जिवंत माणसे मृत दर्शवून अनुदानापासून ठेवले वंचित

जिवंत माणसे मृत दर्शवून अनुदानापासून ठेवले वंचित

Next

- ग्रामसभेत ठराव करून सात माणसांना कागदोपत्री ‘मारले’

- दीड वर्षानंतर प्रकार उघडकीस

- दोषींवर त्वरित कारवाईची मागणी

नांदूरशिंगोटे : चक्क जिवंत माणसे ‘मृत’ दाखवून शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानापासून वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने सोमवार (दि. २६) रोजी सकाळी दहा वाजता गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. ग्रामपंचायत प्रशासनाच्या गैरकारभारामुळे गावात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार गावातील संघर्ष ग्रुपचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके, राजेंद्र दराडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. शासनाने स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१२ अंतर्गत ग्रामीण भागात शौचालय बांधणीसाठी १२ हजार रुपये अनुदान दिले जात होते. २०१९ च्या काळात शासनाने स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत असलेल्या यादीतून अपात्र लाभार्थ्यांची यादी मागविण्यात आल्याचे समजते. यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने मृत, स्थलांतरित, क्षेत्र जास्त, घर नावावर नाही आदी कारणे देत व ग्रामसभेचा ठराव करत या ठरावात चक्क सात लोक जिवंत असतानाही ते मृत दाखविण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सुमारे दीड वर्षानंतर हा प्रकार उघडकीस आला असून ग्रामस्थांच्या हातात ठरावाची नक्कल प्राप्त झाल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी सरपंच गोपाल शेळके, ग्रामविकास अधिकारी एस. डी. अहिरे यांना यादीबाबत विचारणा केली. यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थांचारो ष अनावर झाल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. संबंधित प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाठविलेल्या यादीत बहुतांश आदिवासी व शेतकरी कुटुंबे आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट...

मृत्यूच्या दाखल्याची मागणी

ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मी जिवंत असतानाही मृत दाखविण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागत आहे. मी मृत असल्याने प्रशासनाने मलाम मृत्यूचा दाखला द्यावा, तसेच ग्रामसभेवर असा कोणत्याही प्रकारचा ठराव झालेला नाही. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे मला अनुदानापासून वंचित राहावे लागले आहेत.

- भाऊपाटील दराडे, ग्रामस्थ

इन्फो...

यांना दाखविले मृत...

स्वच्छ भारत सर्वेक्षणची यादी करताना संबंधीत पदाधिकारी व प्रशासनाने घाईगडबडीत जिवंत व्यक्तींना मृत दाखविल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे. यामध्ये भाऊ पाटील, गंगाराम दराडे, मारुती मुरलीधर दराडे, तुकाराम कारभारी शेळके, देवजी लक्ष्मण आगिवले, कचरू राणू मुंगसे, पांडुरंग कोंडाजी मेंगाळ, किसन कोंडाजी मेंगाळ आदींचा समावेश आहे.

कोट ...

सर्वसामान्य ग्रामस्थ वंचित

ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना शासकीय लाभापासून वंचित ठेवले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची संख्या आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- संदीप शेळके, अध्यक्ष, संघर्ष ग्रुप

फोटो - २६ नांदूरशिंगोटे१

नांदूरशिंगोटे येथे स्वच्छ भारत सर्वेक्षणाची यादी चुकीच्या पध्दतीने पाठविल्याने ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकताना संतप्त ग्रामस्थ.

260721\26nsk_10_26072021_13.jpg

नांदूरशिंगोटे येथे स्वच्छ भारत सर्वेक्षणाची यादी चुकीच्या पध्दतीने पाठविल्याने ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकताना संतप्त ग्रामस्थ. 

Web Title: Deprived of grants by showing living dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.