कुमारी माता प्रकरणांची सखोल चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:38+5:302021-02-11T04:16:38+5:30

विभागीय नियोजन आढावा बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेले आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना कुमारीमाता प्रकरणांबाबत विचारले असता त्यांनी सदर प्रकार गंभीर ...

In-depth investigation of Kumari Mata cases | कुमारी माता प्रकरणांची सखोल चौकशी

कुमारी माता प्रकरणांची सखोल चौकशी

Next

विभागीय नियोजन आढावा बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेले आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना कुमारीमाता प्रकरणांबाबत विचारले असता त्यांनी सदर प्रकार गंभीर असल्याचे सांगून अचानक अशाप्रकारे वाढ झाली असेल तर या मागचे कारण देखील शोधले जाईल असे त्यांनी सांगितले. राज्यात यवतमाळ, आंध्रप्रदेशच्या सिमारेषेंवरील भागात असे काही प्रकार आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यातहीअसे प्रकार समेार आले असेल तर ही बाब तपासून घेतली जाईल. पालघर ते नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील प्रसुती प्रकरणांची माहिती घेतली जाणार आहे.

आदिवासी भागात कुमारी माता प्रकरणी अनेक सामाजिक संकेत, आर्थिक, सामाजिक परिस्थिती देखील कारणीभूत ठरते. सदर प्रकार रोखण्यासाठी व्यापक समाजमंथन होण्याची गरज आहे. मुळात असे प्रकार होणार नाहीत याबाबत सामाजिक जाणिव निर्माण करण्याची देखील गरज आहे असे ते म्हणाले. मुळातच अशा प्रकारांना आळा घालणे महत्वाचे काम असल्याचे पाडवी यांनी सांगितले. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुटूंबनियोजनाची शस्त्रक्रीया केलेल्या महिलांच्या व्यवस्थेविषयाची देखील शासनाने गंभीर दखल घेतली असल्याचे पाडवी म्हणाले.

--इन्फो--

नऊ लाख कोंबड्या मारण्याचे काम सुरू

नंदुरबार जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पेाल्ट्रीमधील सुमारे नऊ लाख कोंबड्या मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गावठी कोंबड्यांना बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही. जिल्ह्याचा बर्ड फ्लूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वप्रकारे उपायोजना केली जात असल्याचे सांगून नुूकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे भरपाई देखील दिली जाणार आहे.

Web Title: In-depth investigation of Kumari Mata cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.