देवळा पंचायत समितीच्या उपसभापतींचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:03 PM2018-10-26T15:03:55+5:302018-10-26T15:04:18+5:30

खर्डे - देवळा पंचायत समितीच्या उपसभापती सरला बापू जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला .

Deputy Chairman of Deola Panchayat Samiti resigns | देवळा पंचायत समितीच्या उपसभापतींचा राजीनामा

देवळा पंचायत समितीच्या उपसभापतींचा राजीनामा

Next

खर्डे - देवळा पंचायत समितीच्या उपसभापती सरला बापू जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला . सभापती केशरबाई आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कार्यकारी मंडळाची बैठक घेण्यात आली . या बैठकीत उपसभापती सरला जाधव यांनी आवर्तन पद्धतीनुसार केशरबाई आहिरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला . खर्डे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या केशरबाई आहिरे यांची पंचायत समितीच्या सभापती पदावर वर्णी लागली होती . तसेच पं स दहिवड गणातून शिवसेनच्या सरला जाधव विजयी होऊन त्या उपसभापतीपदी विराजमान झाल्या होत्या . तदनंतर अंतर्गत सर्व सदश्यांच्या ठरल्याप्रमाणे आवर्तनानुसार सरला जाधव यांनी राजीनामा सभापतींकडे सादर केला .तसेच आता तालुक्यातील उपसभापती पदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे . यावेळी कल्पना देशमुख, पंकज निकम ,शांताबाई पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते बापू जाधव ,डॉ कृष्णा आहिरे ,विलास पवार आदी उपस्थित होते .

Web Title: Deputy Chairman of Deola Panchayat Samiti resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक