उपमुख्यमंत्र्यांना निसाकाच्या आश्वासनाची आठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:28 PM2020-02-05T14:28:21+5:302020-02-05T14:29:41+5:30
सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखाना सुरु करू यासाठी राष्टवादी काँग्रेसचा आमदार विधानसभेत पाठवा असे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत आश्वासन दिले होते. यासंदर्भात काय उपाय योजना सुरू आहे असे आशयाचे निवेदन देत सदर प्रश्नाची आठवण करून देताच हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच पवारांनी कार्यकर्त्यांना दिले.

राष्टÑवादी काँग्रेसचे निफाड तालुका कार्यअध्यक्ष भूषण शिंदे यांनी अजित पवार नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता त्यांना निसाका, रासाका आणि केजीएस संदर्भात आठवण करून देत निवेदन दिले. यावेळी तालुक्यातील शेतकरी युवक मोठया संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांनी दिलेल्या उत्तराने निसाका लवकरच सुरू होईल अशी आशा जागृत झाली आहे. गेल्या काही वर्षापासून निफाड सहकारी साखर कारखाना बंद आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी निफाड, रानवड सहकारी साखर कारखाना सुरु करण्याचे आपल्या प्रचार सभांमधून घोषणा केली होती. याच कालावधीत निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवस्वराज्य यात्रेदरम्यान झालेल्या कार्यक्र मात अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, तुम्ही मला निफाडला राष्ट्रवादीचे आमदार द्या, मी तुमचा साखर कारखाना चालू करतो. त्याप्रमाणे निफाडकरांनी दिलीप बनकर यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा आमदार दिला. आता तुम्ही आमचा निसाका चालू करा अशी जाणीव निवेदनाद्वारे निफाड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भूषण शिंदे यांनी केली आहे.