उपआयुक्त पाटील यांची बदली;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:05 AM2020-10-11T00:05:45+5:302020-10-11T00:35:08+5:30
नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची शासनाच्या गृह विभागाकडून बदली करण्यात आली आहे. त्यांचे नव्याने पदस्थापनेचे आदेश अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. दरम्यान, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि आयुक्तालय प्रशासन विभागाच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांची ३० सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश गृह विभागाकडून शुक्र वारी (दि.९) काढण्यात आला.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात पाटील हे मागील पाच वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी परिमंडळ एकचे उपआयुक्त म्हणून सुरूवातीला पदभार स्वीकारला. दरम्यानच्या काळात मनपाची अनधिकृत धार्मिक स्थळे अतिक्र मण हटाव मोहीम, विधानसभा, लोकसभा निवडणुका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा, मराठा क्र ांती मोर्चा, ट्रिपल तलाक विधेयक निषेधार्थ मुस्लीम महिला मोर्चा, सीएए-एनआरसीला विरोध, विविध सण-उत्सव, मिरवणुका अशा विविध महत्त्वाच्या काळात त्यांनी शहर व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त व योग्य नियोजन करत कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मुथुट फायनान्स कार्यालयावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर पाटील यांच्याकडे शहर गुन्हे शाखेच्या उपआयुक्तपदाची सूत्रेसोपविली गेली. दरम्यान पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची शासनाकडून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तपदी मुंबई पोलीस दलातील अधिकारी उपआयुक्त संग्रामसिंह निशानदार यांची काही दिवसांपूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चौगुले यांच्याकडे असलेला यापूर्वीचा पदभार तूर्तास कायम आहे.