उपमहापौरच करणार नाशिक महापालिकेच्या महासभेचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 06:59 PM2020-11-19T18:59:32+5:302020-11-19T19:02:44+5:30
नाशिक- महापौर सतीश कुलकर्णी यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल असतानाही शुक्रवारी (दि.२०) तेच महासभा संचलीत करणार असल्याचे ठरवण्यात आले खरे मात्र, डॉक्टरांनी नकार दिल्याने अधिनियमातील तरतुदीनुसार उपमहापौर भिकुबाई बागुल याच महासभा संचलीत करणार आहेत.

महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभेची तारीख घोषीत केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रश्न निर्माण झाला होता. महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार महापौरांच्या अनुपस्थितीत उपमहापौर सभा संचालीत करू शकतात. मात्र, त्यानंतरही महापौर कुलकर्णी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार ते रूग्णालयातून तर स्थायी समिती सभापती गणेश गिते हे महापालिकेत पीठासन अधिकारी म्हणून ही सभा चालवणार असल्याचे सांगण्यात आले होते. गीते यांनीही त्यास दुजोरा दिला होता. दरम्यान, आता महापौरांना रूणाल्यातून सभा चालवणे अडचणीचे असून डॉक्टरांनी त्यास नकार दिल्याने आता महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार उपमहापौर भिकुबाई बागुल याच पीठासन अधिकारी म्हणून काम बघतील अशी माहिती नगरसचिव विभागाच्या सूत्रांनी दिली.
महापालिकेच्या या मासिक सभेत फारसे विषय नसले तरी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहातील स्वच्छतेच्या ठेक्यात कार्योत्तर बिल अदा करण्यास मंजुरी करणे याबरोबरच मनसेचे योगेश शेवरे यांनी सध्या गाजत असलेल्या भूसंपादन मोबदला प्राधान्यक्रमाचा प्रस्ताव नामंजुर करण्यासाठी अशासकिय प्रस्ताव दिला आहे.