विधानसभा उपाध्यक्षांनी धरला गोंडी नृत्यावर ताल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 07:56 PM2021-01-05T19:56:14+5:302021-01-06T00:53:21+5:30

वणी/दिंडोरी : आदिवासी लोककलेची परंपरा जपत उपराजधानी नागपूर येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी गोंडी नृत्य सादर करून, आदिवासी परंपरेचे जतन केले. झिरवाळ यांच्या स्वागतासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना प्रेरणा देत, कलाकारांचा आनंद द्विगुणित केला.

The Deputy Speaker of the Assembly held a rhythm on Gondi dance | विधानसभा उपाध्यक्षांनी धरला गोंडी नृत्यावर ताल

विधानसभा उपाध्यक्षांनी धरला गोंडी नृत्यावर ताल

googlenewsNext
ठळक मुद्देपरंपरेचे दर्शन : कलाकारांचा आनंद द्विगुणित

नरहरी झिरवाळ नागपूर येथील विधानभवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी रेल्वेने आले, तेव्हा विदर्भातील आदिवासी बांधवांनी त्यांचे जंगी पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत केले. तेथे कलाकारांनी लोककलेचे गोंडी नृत्य सादर केले. हाडाचे कलाकार असलेले व नृत्य कौशल्यात निपुण असलेल्या झिरवाळ यांनी गोंडी नृत्याच्या तालावर ठेका धरला व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रशासकीय व्यवस्थेचे घटकही झिरवाळ यांचा नृत्याविष्कार पाहून त्यांच्या वेगळ्या रूपाने अचंबित झाले.
झिरवाळ यांचे वेगळे रूप
मुळातच सर्वसामान्य कुटुंबातील अन‌् जनसामान्यांमध्ये मिसळणारे म्हणून परिचित असलेल्या झिरवाळ यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड आहे. आदिवासींची लोककला, संस्कृती यांची जपणूक करणे, तसेच आदिवासी बांधवांनी ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेणे, त्यातून निर्भेळ आनंद प्राप्त करतात. पदाचा कोणताही मोठेपणा न दाखविता एकरूप होणे, असे व्यक्तिमत्त्व असलेल्या झिरवाळ यांचे वेगळे रूप या निमित्ताने नागपूरवासीयांना पाहावयास मिळाले.

Web Title: The Deputy Speaker of the Assembly held a rhythm on Gondi dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.