शेतकऱ्यांच्या प्रयोगांचे चित्रण करा : मकरंद अनासपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:28 AM2018-05-29T01:28:03+5:302018-05-29T01:28:03+5:30
शेतकयांनी सुखी समृद्ध होण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता काम केल्यास त्याला यश मिळू शकते असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
तळवाडे दुंधे : शेतकºयांनी सुखी समृद्ध होण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता काम केल्यास त्याला यश मिळू शकते असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. मालेगाव तालुक्यातील तळवाडे दुंधे येथे कृषीरत्न फाऊंडेशनतर्फे आयोजित मोफत खते व बियाणे वाटप कार्यक्रमात अनासपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शोभा जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव बाजार समितीचे संचालक बंडूकाका बच्छाव, अजिंक्य भुसे, संजय हिरे, नवल मोरे, कृष्णा बावीस्कर, प्रफुल अहिरे उपस्थित होते. यावेळी अनासपुरे म्हणाले, तरुणांनी उटसुट सेल्फी व फेसबुकमध्ये गुंतुन न राहता शेतकºयांच्या व्यथांचे चित्रण करावे, शेतकºयांनी शेतात केलेले नवनवीन प्रयोग याचे चित्रण करुन समाजापुढे मांडावे. यावेळी रामेश्वर ता. देवळा येथील जिजाबाई पोपट पवार, कळवणचे बळवंत बापुराव पाटील, सटाण्याचे उज्ज्वला शिवाजी देवरे, किकवारी ता. सटाणा येथील त्र्यंबक दावल काकुळते, पिळकोस ता. कळवण येथील ज्योती प्रवीण जाधव, आघार ता. मालेगाव येथील राजेंद्र त्र्यंबक हिरे, दाभाडी येथील भावना निळकंठ निकम, वडेल येथील नयन लोटन सोनवणे, तिसगाव ता. देवळा येथील तुळशीराम कान्हु जाधव यांना कृषीरत्न आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, देशाच्या सिमेवर लढताना शहीद झालेल्या जवानाचे कुटुंब, अपंग, निराधार व आर्थिक दुर्बल घटकातील १०१ शेतकरी कुटुंबांना कृषीरत्न फाऊंडेशनतर्फे मोफत खते व बियाणांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक कृषीरत्न फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश पवार यांनी केले. सूत्रसंचलन शिवदास निकम व सागर रौंदळ यांनी तर आभार प्रदर्शन बादलसिंग राजपूत यांनी केले. कार्यक्रमास अमोल देशमुख आदि उपस्थित होते.