साध्वी प्रज्ञासिंग प्रकरणी निवेदने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:59 AM2019-04-24T00:59:34+5:302019-04-24T01:00:06+5:30
मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची चौकशी करण्यात येऊन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी काही संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक : मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची चौकशी करण्यात येऊन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी काही संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संगिनी महिला जागृती मंडळाच्या वतीने याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शहीद करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांचा जामीन रद्द करावा, त्यांची उमेदवारी रद्द करावी, सार्वजनिक ठिकाणच्या जाहीर कार्यक्रमांना त्यांना बंदी घालावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी मंडळाच्या कल्याणी अनिता मनोहर, शीतल पवार, राहुल जºहाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
छात्र भारतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेनात साध्वीचे वक्तव्य निषेधाहार्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांना निवडणूक लढण्यास मज्जाव करावा, शहीद प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर राकेश पवार, सदाशिव गणगे, निवृत्ती खेताडे, आम्रपाली वाकळे, राम सूर्यवंशी, देवीदास हजारे, भालचंद्र राजपूर, समाधान बागूल, सागर चित्ते, अनिकेत काची आदींच्या स्वाक्षरी आहेत.
भारतीय ट्रेड युनियनतर्फे निषेध
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएसचे प्रमुख अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी जी भाषा वापरली आहे त्याचा भारतीय ट्रेड युनियन केंद्राने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. यासंबंधी जिल्हाधिकाºयांनी निवेदन देण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डॉ. डी. एल. कराड, अॅड. वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, देवीदास आडोळे, दिनेश सातभाई, सिंधू शार्दुल, कल्पना शिंदे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.