‘शेक्सपियरच्या साहित्यात माणसांचे स्वभाव वर्णन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:20 AM2019-01-13T01:20:23+5:302019-01-13T01:20:41+5:30
शेक्सपियरच्या साहित्यातून आपल्या आसपासच्या सर्वसामान्य, बुद्धिवंत, षडयंत्र करणारे, कटकारस्थान करणारे, पश्चात्ताप करणारे आणि प्रेम, दयामाया दाखविणाऱ्या माणसांचे स्वभाव आणि मानसिकतेचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शेक्सपियरच्या साहित्यातील पात्र आपल्याच आजूबाजूला असल्याचे प्रत्येकाला सातत्याने जाणवत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी केले.
नाशिक : शेक्सपियरच्या साहित्यातून आपल्या आसपासच्या सर्वसामान्य, बुद्धिवंत, षडयंत्र करणारे, कटकारस्थान करणारे, पश्चात्ताप करणारे आणि प्रेम, दयामाया दाखविणाऱ्या माणसांचे स्वभाव आणि मानसिकतेचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. त्यामुळे शेक्सपियरच्या साहित्यातील पात्र आपल्याच आजूबाजूला असल्याचे प्रत्येकाला सातत्याने जाणवत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पद्माकर पुंडे यांनी केले.
संवाद संस्थेतर्फे कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात शनिवारी (दि.१२) प्रा. बाळासाहेब गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित व्याख्यानात ‘शेक्सपियरच्या नाटकातील आपली माणसं’ या विषयावर ते बोलत होते. पद्माकर पुंडे म्हणाले, लोकांची मानसिकता हा शेक्सपियरच्या साहित्याचा आत्मा आहे. त्याची पात्रे वैश्विकच होती. माणूस विचार करीत बसला तर त्याच्या हाती काही लागणार नाही.
त्यासाठी त्याने कृती करणे गरजेचे आहे. शेक्सपियरच्या प्रत्येक नाटकातील विविध पात्रे मानवाच्या मनावर हेच बिंबवतात. हॅम्लेट, ज्युलियस सिझर, किंगलियर या नाटकांमधील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्येही त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर रंगतदार शैलीत उभी केली. प्रास्ताविक संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा बोºहाड यांनी केले.