देशमानेत तीव्र पाणी टंचाई; टँकर सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:41 PM2019-05-12T18:41:57+5:302019-05-12T18:43:48+5:30

देशमाने : गाव व परिसरातील वाडीवस्त्यावर तीव्र पाणीटंचाई असून वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करूनही अद्याप टँकर सुरू न झाल्याने वाडीवस्त्यावरील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Desert water scarcity; Demand for the start of the tanker | देशमानेत तीव्र पाणी टंचाई; टँकर सुरू करण्याची मागणी

देशमानेत तीव्र पाणी टंचाई; टँकर सुरू करण्याची मागणी

Next
ठळक मुद्दे प्रशासनाने या मागणीकडे अद्यापही दुर्लक्षच केले आहे.

देशमाने : गाव व परिसरातील वाडीवस्त्यावर तीव्र पाणीटंचाई असून वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करूनही अद्याप टँकर सुरू न झाल्याने वाडीवस्त्यावरील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पालखेड कालव्याचे पहिले आवर्तन जेमतेम मिळाले. अन अल्पसा पडलेला पाऊस यामुळे शिवारातील विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठला. विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्यावर पुढील दोन महिने नागरिकांनी तहान भागविली. मात्र एप्रिलमध्ये पडलेल्या कडक उन्हात विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीत व्यस्त असलेल्या प्रशासनाने या मागणीकडे अद्यापही दुर्लक्षच केले आहे.
गत आठवड्यात जिल्हा दुष्काळ दौऱ्यावर आलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसात टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र आठवड्यानंतरही कुठलीच कार्यवाही न झाल्याने नागरिकांवर अन्य ठिकाणाहून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाºयाचा प्रश्नगंभीर झाला आहे. अनेकांनी आपली जनावरे पाणी व चाºयाअभावी विकण्यास सुरवात केली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेततळी बनवून फळबागा उभ्या केल्यात. मात्र पाण्याअभावी शेततळी कोरडी पडल्याने शेततळ्याच्या आच्छादनाचे देखील उन्हामुळे मोठे नुकसान होत आहे. परिणामी परिसरातील फळबागा देखील सुकू लागल्याने शेतकºयांना दुहेरी संकटाना सामोरे जावे लागत आहे. अद्यापही पावसाळा सुरू होण्यास किमान महिनाभराचा कालखंड जाणार त्यातही पाऊस वेळेत पडला नाहीतर शेतकºयांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, सध्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीने वाडी-वस्त्यांवर टँकर सुरू करावे असी मागणी सरपंच विमल शिंदे, शिवाजी शिंदे, गणेश दुघड, भागवत राठोड, अंतू काळे, योगेश गांगुर्डे, प्रभाकर जगताप, नानासाहेब शिंदे, भारत बोरसे, सखाहरी गोरे, कैलास जगताप, प्रभाकर जाधव, संजय जाचक, नितीन जगताप आदींनी केली आहे.

फोटो १२ जायखेडा १, १२ जायखेडा २, १२ जायखेडा ३)
१) विहिरी कोरड्या पडल्याने अन्यठिकानाहून पाणी आणून विहिरीत टाकताना.
२)पाण्याअभावी कोरडी पडलेली शेततळी.
३)आदिवासी वस्तीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना.

Web Title: Desert water scarcity; Demand for the start of the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी