देशमाने परिसरात पावसाची ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 06:09 PM2020-06-21T18:09:07+5:302020-06-21T18:09:35+5:30
देशमाने : परिसरात अत्यल्प पावसावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या, मात्र पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने शेतकरीवर्गाच्या चिंतेत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देशमाने : परिसरात अत्यल्प पावसावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या, मात्र पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने शेतकरीवर्गाच्या चिंतेत भर पडली आहे.
मृग नक्षत्राच्या पावसाने परिसरात अत्यल्प हजेरी लावली. पेरणीयोग्य ओल होताच सोयाबीन, मका, बाजरी आदी खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. पेरणी आटोपताच पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. जमिनीतून कोंब बाहेर निघण्याच्या अवस्थेत असून उन्हाच्या चटक्याने पीक सुकू लागली आहे. आगामी दोन दिवसात पाऊस न पडल्यास ही पिके करपतील या भीतीने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाचा संसर्गामुळे अगोदरच शेती अन् शेतकरी पूर्णत: संकटात आहे. अशाही परिस्थितीत उधार उसनवारी करीत शेतकऱ्यांनी पिके उभी केली आहे, मात्र ही पिके पावसाअभावी गेली तर? अशी चिंता परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
चौकट...
राजापूर येथे कोळपणी कामात शेतकरी व्यस्त
राजापूर : परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी मका, बाजरी, मूग, भुईमूग, कपाशी, सोयाबीन, उडीद, तूर आदी पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पिके शेतात रु जली असून आता, कोळपणी कामात शेतकरी वर्ग व्यस्त आहे. विहिरींना अजूनही पाणी नाही व शेतकºयांना लाल कांदा उळे टाकण्यासाठी पावसाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे कोणी गावात व बाहेर गावी न फिरता शेतात मात्र कामे करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.