आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी आयटककडून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:02 PM2018-01-17T19:02:36+5:302018-01-17T19:24:07+5:30
आशा व गटप्रवर्तक महिलांकडून विना मोबदला काम करून घेणो बंद करून त्यांना दरमहा 18 हजार रु पये किमान वेतन देण्यात यावे, लसीकरण आणि कुष्ठरोग सव्र्हेच्या कामासाठी दररोज किमान तीनशे रुपये मोबदला द्यावा यांसह मनरेगा कामगार व ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
नाशिक : आशा व गटप्रवर्तक महिलांकडून विना मोबदला काम करून घेणो बंद करून त्यांना दरमहा 18 हजार रु पये किमान वेतन देण्यात यावे, लसीकरण आणि कुष्ठरोग सव्र्हेच्या कामासाठी दररोज किमान तीनशे रुपये मोबदला द्यावा यांसह मनरेगा कामगार व ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. 17) आयटकच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
आयटकच्या माध्यमातून आशा व गटप्रवर्तक, महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटना यांनी एकत्रितरीत्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले. या निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी संघटनांनी, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आयटकशी संलग्न असलेल्या या संघटनांनी बुधवारी देशव्यापी आंदोलन करीत त्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, मनरेगा, एकात्मिक बालविकास योजना, पोषण आहार आदी विभागातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. सर्व कर्मचा:यांना किमान वेतन 18 हजार रु पये मिळावे, सामाजिक सुरक्षा लागू करावी, आशा व आशा गटप्रवर्तक अल्प मानधनावर काम करत असून, ते मानधनही शासनस्तरावरून वेळेत दिले जात नाही. तसेच शासकीय जिल्हा रु ग्णालय, नाशिक ग्रामीण रु ग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा कर्मचा:यांना सन्मानाची वागणूक मिळावी, अंशकालीन स्त्री परिचरांना किमान सहा हजार रु पये मानधन त्वरित लागू करावे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कायम राबविण्याचे जाहीर करावे, आरोग्य विमा योजनेचा मोफत लाभ द्यावा तसेच आशा व आशा गटप्रवर्तक महिला कर्मचा:यांची शासनाच्या आरोग्य खात्यातील रिक्त पदांवर नेमणुका कराव्यात (त्यासाठी त्यांची परीक्षा, प्रशिक्षण व मुलाखतीसंबंधी आदेश करावेत), अशी मगणी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले, सुवर्णा मेतकर, विजय दराडे, माया घोलप, सुमन बागुल, मनीषा खैरनार, अर्चना गडाख, छाया खैरनार, दीपाली कदम, रूपाली सानप, सुरेखा खैरनार आदींनी केली आहे.