देशमाने जिल्हा परिषद शाळेला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 09:45 PM2021-06-03T21:45:05+5:302021-06-04T01:12:39+5:30

जळगाव नेऊर : क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत देशमानेचे विद्यमान सदस्य संजय खैरनार यांनी जिल्हा परिषद शाळेला ३३ हजार रुपये भेट दिले.

Deshmane helps Zilla Parishad school | देशमाने जिल्हा परिषद शाळेला मदत

देशमाने येथे ३३ हजाराचा धनादेश अनारसे यांच्याकडे सुपूर्द करताना संजय खैरनार समवेत गणेश दुघड, प्रमोद दुघड.

Next
ठळक मुद्देलोकवर्गणीतून जिल्हा परीषद शाळेचे दुमजली बांधकाम चालू आहे.



जळगाव नेऊर : क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत देशमानेचे विद्यमान सदस्य संजय खैरनार यांनी जिल्हा परिषद शाळेला ३३ हजार रुपये भेट दिले.

गावातील जिल्हा परिषद शाळा इमारतीची अवस्था खूप बिकट झाली होती. जिल्हा परिषद नाशिक व इंम्फती फाउंडेशन, देशमाने ग्रामस्थ यांच्या लोकवर्गणीतून जिल्हा परीषद शाळेचे दुमजली बांधकाम चालू आहे. आपणही या शाळेचे देणे लागतो या उद्देशाने संजय खैरनार यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ३३ हजार रुपये शालेय बांधकामासाठी मदत दिली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनारसे, शालेय समितीचे अध्यक्ष गणेश दुघड, सरपंच प्रमोद दुघड, सुनील खैरनार, शरद बागुल, नानासाहेब जगताप, भगवान खरात, विनोद बागुल आदी उपस्थित होते.
 

Web Title: Deshmane helps Zilla Parishad school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.