देशमाने आदीवासी वस्तीतील अंगणवाडीचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:36 PM2019-12-07T16:36:52+5:302019-12-07T16:37:43+5:30
देशमाने : येथील आदिवासी वस्तीतील अंगणवाडी सभोवताली असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्र ार केली जात आहे.
देशमाने : येथील आदिवासी वस्तीतील अंगणवाडी सभोवताली असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्र ार केली जात आहे.
सदर अंगणवाडीत आदिवासी वस्तीतील लहान मुले असून अंगणवाडी लगत गाजरगवत व अन्य तण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मुलांच्या आरोग्यासह जीवितास धोका निर्माण झाला आहे.
वाढलेल्या गाजरगवतामुळे या ठिकाणी परिसरातील लोक प्रार्तविधी करीत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. शिवाय या भागात डुकरांचे प्रमाण अधिक असून त्यामुळे मुलोचे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामपचायतीकडून परिसर स्वच्छतेची मागणी पालकांनी केली आहे.
मुलांचे दैव बलवत्तर म्हणून आजचा होणारा मोठा अनर्थ टळला, शनिवारी (दि.७) दुपारच्या सुमारास अंगणवाडी लगत साप आढळून आला. मात्र अंगणवाडीतुन मुले घरी गेलेले होते. मात्र याप्रकारामुळे पालक भयभित झाले आहेत.
संजय खैरनार, देशमाने.
(फोटो ०७ देशमाने)
देशमाने (बु) येथे आदिवस्तीतील अंगणवाडी वाढलेले गाजरगवत.