निकालाची उत्कंठा अन् वाहतुकीची कोंडी

By admin | Published: May 26, 2017 02:11 PM2017-05-26T14:11:29+5:302017-05-26T14:11:29+5:30

मालेगाव : येथील महानगर पालिका निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरीकांनी मतमोजणी केंद्रांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

Desire of passage and traffic congestion | निकालाची उत्कंठा अन् वाहतुकीची कोंडी

निकालाची उत्कंठा अन् वाहतुकीची कोंडी

Next

मालेगाव : येथील महानगर पालिका निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरीकांनी मतमोजणी केंद्रांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने शहरातील अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. या कोंडीतुन मार्ग काढताना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली तर बाहेरगावहुन आलेल्या वाहनचालकांचा काहीकाळ गोंधळ उडाला. मतदान केंद्रांजवळची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना काहीवेळा बळाचा वापर करीत सौम्य लाठीमारही करावा लागला.
एकुण ८४ जागा असलेल्या मालेगाव महानगर पालिकेत कॉँग्रेसच्या एक महिला उमेदवार बिनविरोध निवडुन आल्याने ८३ जागांसाठी मतदान घेण्यात आले. गतवेळपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी कमी असल्याने विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली होती. शुक्रवारी शहरातील वेगवेगळ्या सात ठिकाणी निवडणुकीची मतमोजणी झाली. निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांचे समर्थक आणि वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते यांनी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बहुसंख्य मतमोजणी केंद्र शहरातील प्रमुख रस्त्यांवरच असल्याने या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. उत्साही कार्यकर्ते आणि बेशिस्तच वाहनचालक यांना आवर घालतांना पोलिसांची अनेकवेळा धावपळ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जुना आग्रा रोडवरील शिवाजी महाराज पुतळयाजवळील जाखोटीया भवन येथे असलेल्या मतमोजणी केंद्रासमोर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ठिकठिकाणी कार्यकर्ते घाळका करुन उभे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुन कोंडी झाली. कार्यकर्त्यांची गर्दी त्यात बेशिस्त वाहनचालक यामुळे यात अधिकच भर पडत होती. अनेक ठिकाणी पोलीस आणि वाहनचालक यांच्यात शाब्दीक बाचाबाचीचे प्रकारही पाहावयास मिळाले. सकाळी ११ वाजेदरम्यान येथील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी आणि गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत सौम्य लाठीमारही केला. यामुळे मतमोजणी केंद्र परिसरासह मोसम पुल परिसरातील वाहतुक सुरळीत झाली. शिवाजी जिमखाना, शासकीय तंत्रनिकेतन, तालुका क्रीडा संकुल परिसरातील मतमोजणी केंद्रांवरही काहीशी अशीच परिस्थिती असल्याचे दिसुन आले.

Web Title: Desire of passage and traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.