आडात असूनही नांदगावकरांचा पोहरा रिकामाच!

By admin | Published: February 18, 2016 10:39 PM2016-02-18T22:39:41+5:302016-02-18T22:42:51+5:30

उद्धवा, अजब तुझे सरकार : पाणीसंकटाने नांदगावकर त्रस्त

Despite obstacles, Nandgaonkar's potholes are empty! | आडात असूनही नांदगावकरांचा पोहरा रिकामाच!

आडात असूनही नांदगावकरांचा पोहरा रिकामाच!

Next

संजीव धामणे नांदगाव
‘घडलंय बिघडलंय’ सारखी नांदगावच्या पाणीपुरवठ्याची स्थिती झालीय. आडात असूनही पोहऱ्यात पाणी येत नाही. प्रत्येक आवर्तनाचा वाढत जाणाऱ्या कालावधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. दहा दिवसांचा पाणीपुरवठा पंधरा/सतरा दिवसांवर येऊन पोहोचला आहे. दरम्यान, पदाचा आवर्तन कालावधी संपल्याने भावी नगराध्यक्षांनी खुर्चीसाठी कंबर कसली आहे. पाणी वाहून मात्र नागरिकांच्या कंबरा वाकड्या झाल्या आहेत.
शहराला गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व माणिकपुंज धरण या दोन योजनांमधून पाणीपुरवठा होतो. शहराची मूळ योजना दहेगाव धरणातून असून, ते चार वर्षांपासून कोरडेठाक पडले आहे. गिरणा धरण योजना जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग चालवतो. नांदगाव येथील जलकुंभापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची आहे. मात्र नगरपालिका हद्दीतले वितरण पालिकेकडे आहे. वितरणाचे तब्बल ४४ भाग आहेत. काही व्हॉल्व्ह बदलले व प्रशासकीय सुसूत्रता आणली तर आवर्तन कालावधी कमी करणे सहज शक्य आहे. गेले तीन-चार महिने यावर मंथन सुरू आहे. पण कृतिशून्य व कागदोपत्रीच मंथन सुरू असल्याने आवर्तनागणिक नागरिकांच्या हालअपेष्टा वाढत चालल्या आहेत. त्यात नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागल्याने ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ असे म्हणायची वेळ आली आहे.
नगरसेवक तेच.. पण जोडीला प्रशासनाची कूर्मगती अनाकलनीय आहे. वितरण व्यवस्थेत ८० ते ९० व्हॉल्व्ह आहेत. त्यापैकी १० ते १२ व्हॉल्व्ह जुने झाल्याने अकार्यक्षम झाले आहेत. काही ठिकाणी नवीन बसवणे गरजेचे असून, त्यासाठी काही लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सहा महिन्यांपूर्वी ही समस्या भविष्यात उग्र स्वरूप धारण करणार असल्याचे संकेतही मिळाले होते. पण कार्यवाहीचे ‘कासव’ स्वभावगुणानुसार संथ गतीनेच काम करत असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर प्रशासनाकडे किती पाठपुरावा केला हा संशोधनाचा विषय आहे. तसाच मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांच्याकडून जनतेने गतिमान प्रशासनासाठी अपेक्षा व्यक्त केली तर वावगे ठरू नये. यासंदर्भात प्रांताधिकारी वासंती माळी यांनी त्यांना पत्रही दिले आहे. घंटागाडीसाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. प्रशासकीय मान्यता चार लाख १६ हजार रुपयांना मिळाली. याला झाले वर्ष.. अद्याप घंटाही नाही व गाडीसुद्धा नाही. प्रत्येक बुधवारी अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती. तीन बुधवारनंतर तिचेही सूप वाजले. जोमाने अतिक्रमणधारकांनी तथास्तुचा उद्घोष करत पुन्हा जागा बळकावल्या. पालिकेने हाती घ्यावयाच्या इतर मूलभूत सुविधा व गरजांची वाट लागल्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याची वाटचालही त्याच दिशेने सुरु असल्याचे चित्र आहे. मात्र
पाणी जीवनावश्यक असून
त्यासाठी भविष्यात हातघाईचे प्रसंग येऊ नयेत.

Web Title: Despite obstacles, Nandgaonkar's potholes are empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.