कोट्यवधी खर्च होऊनही जवळके -राजापूर रस्ता ‘कंगाल’च !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:14 AM2021-07-27T04:14:30+5:302021-07-27T04:14:30+5:30
रस्त्याच्या कामाच्या तरतुदीत किमान पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती ही संबंधित ठेकेदारांकडे आहे, मात्र दुरुस्ती करून घेण्यात संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत ...
रस्त्याच्या कामाच्या तरतुदीत किमान पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती ही संबंधित ठेकेदारांकडे आहे, मात्र दुरुस्ती करून घेण्यात संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्यावर कोट्यवधी निधीचा खर्च झालेला आहे, मात्र काम होत असताना अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एक वर्षात सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, सध्या या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे जिकिरीचे होत असून, अनेक दुचाकींचे अपघात होत आहेत. सदर रस्त्याची पाच वर्षे देखभाल-दुरुस्ती संबंधित ठेकेदार यांची असताना दुरुस्ती होत नसल्याने वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी त्वरित सदर रस्त्याची पक्की दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाले यांनी दिला आहे.
260721\26nsk_2_26072021_13.jpg
जवळके वणी - मातेरेवाडी - राजापूर रस्त्याची झालेली दूरवस्था.