दिव्यांगांप्रती समाजाची असंवेदना नष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:32 AM2019-01-05T01:32:49+5:302019-01-05T01:36:24+5:30
दिव्यांगांना सहानुभूती नको तर त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी समाजाने पुढे येऊन दिव्यांगाप्रती असंवेदनशीलता संपवली पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई.वायुनंदन यांनी केले.
सातपूर: दिव्यांगांना सहानुभूती नको तर त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी समाजाने पुढे येऊन दिव्यांगाप्रती असंवेदनशीलता संपवली पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई.वायुनंदन यांनी केले.
सातपूर येथील नाईस सभागृहात आयोजित नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. वायुनंदन यांनी पुढे सांगितले की, समाजातील वंचित घटक आणि अपंग यांच्याविषयी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना सहानुभूतीची गरज नाही, तर स्वाभिमानाने जगता यावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विशाखा संस्थेचे संचालक प्रकाश अतकरे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार अॅड. भागचंद चुडीवाल, गोपी मयूर, सूर्यभान साळुंखे, मंगला कलंत्री आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाºयांना आणि राज्यातील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श संस्था पुरस्कार प्राप्त दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक प्रा. यजुर्वेद महाजन तसेच गणेश गुप्ता, शंकर वानेरे, प्रा. विशाल कोरडे
आदींनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार परीक्षक म्हणून डॉ. माणिक गिरीधारी, डॉ. सुनील कुटे, प्रा. सिंधू काकडे, प्रा.विजयकुमार पाईकराव यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन सुगंधा शुक्ल यांनी केले. प्रा.सिंधू काकडे यांनी आभार मानले.
दिव्यांगांना मोफत शिक्षण देणार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून दिव्यांगांकडून शिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याची ग्वाही कुलगुरू ई.वायुनंदन यांनी यावेळी दिली. तसेच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक साधनसामुग्रीसाठीदेखील सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. समाजानेदेखील त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतल्यास दिव्यांगांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असेही वायुनंदन यांनी सांगितले.
असे आहेत पुरस्कारार्थी
आदर्श प्राध्यापक पुरस्कार (अंध)-प्रा.विजय कोरडे, श्री शिवाजी कॉलेज, जिल्हा अकोला.
४आदर्श शिक्षक (डोळस). शंकर भीमराव वानेरे. अंध निवासी विद्यालय, बुलढाणा. अंध शिक्षक : मनिराम परशराम चौधरी, रयत शिक्षण संस्था, साकोरे, ता.नांदगाव. डोळस शिक्षिका : सुनीता बाळासाहेब वढणे, नॅब अंध मुलींची शाळा, श्रीरामपूर;
४आदर्श संस्था-दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव. (संस्थापक प्रा.यजुर्वेद महाजन)
४विशेष सेवा पुरस्कार : सकिना संदीप बेदी, जागृती अंध मुलींची शाळा, आळंदी, पुणे.