विराणेत दारूभट्ट्या उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:55 PM2020-04-28T20:55:32+5:302020-04-28T23:02:03+5:30
वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवन परिसरातील विराणे येथील ग्रामरक्षक दलाने तीन हजार लिटर गावठी दारू पकडत वीस दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवन परिसरातील विराणे येथील ग्रामरक्षक दलाने तीन हजार लिटर गावठी दारू पकडत वीस दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत.
वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. डी. मातोळे, पोलीस कॉन्स्टेबल के. बी. देवरे, आर.जे. पारधी यांनी घटनास्थळी भेट देत भट्टी मालक दिलीप माळी, अनुसया माळी यांच्या विरोधात पंचनामा
करून कारवाई करता गुन्हा दाखल केला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व जमावबंदी आदेश असतानादेखील दारू विक्रे त्यांच्या घरी व अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी गावकऱ्यांना दिसून येत होती.
दारू विक्रेत्याने ग्रामरक्षक दलाच्या तरुणांना दमबाजी केली. अखेर वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या वतीने दारूनिर्मितीची साधने जप्त केली. यावेळी माजी सरपंच नामदेव पगार, तंटामुक्ती अध्यक्ष नानाजी पगार, शांताराम पगार, दीपक माळी, समाधान जाधव, अकबर शेख, गोरख माळी, एकनाथ पगार, रमजान पिंजारी, अमोल सोनवणे, शेखर पगार, विकी सोनवणे, समाधान ठाकरे, यशवंत अहिरे, अतुल देवरे, संजय पगार आदी सदस्य उपस्थित होते.