तळवाडे येथे कालव्याची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:56 AM2019-08-23T00:56:10+5:302019-08-23T00:56:27+5:30
बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पातून तळवाडे दिगर येथील कालव्याला पूरपाणी सुरू असताना चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी कालव्याची नासधूस करून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच कालवा फोडण्याचीदेखील धमकी दिली
सटाणा : बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पातून तळवाडे दिगर येथील कालव्याला पूरपाणी सुरू असताना चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी कालव्याची नासधूस करून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच कालवा फोडण्याचीदेखील धमकी दिली असल्यामुळे तळवाडे दिगर येथील ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता अभिजित रौंदळ, तहसीलदार जितेंद्र इंगळे व सटाणा पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
पठावे दिगर येथे पाटबंधारे विभागाचा लघुप्रकल्प असून, त्या प्रकल्पातून कालवा जातो. कालव्यातून २० आॅगस्ट रोजी दुपारी विसर्ग सुरू करण्यात आला असून, स्थानिकांनी त्याला विरोध केला. बुधवारी रात्री स्थानिक ग्रामस्थांनी कालव्यातून कागद चोरून नेल्याची माहिती कर्मचाऱ्याने दूरध्वनीद्वारे ग्रामस्थांना कळविली.