नाशकता जुन्या रिक्षा, टॅक्सीवर बंदीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:19 PM2018-02-13T14:19:33+5:302018-02-13T14:20:38+5:30
नाशिकमधील रिक्षा या मुंबई व ठाण्याच्या तुलनेत चांगल्या
नाशिक : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा व टॅक्सीची वयोमर्यादा वीस वर्षे ठरविल्यामुळे त्याचा फटका या व्यवसायावर, उदरनिर्वाह करणाºयांवर बसणार असून, मोठ्या प्रमाणात वाहने हद्दपार होणार असल्याने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी भद्रकाली आॅटोरिक्षा युनियनने केली आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची डिसेंबर महिन्यात बैठक होऊन त्यात रिक्षा व टॅक्सी यांची वीस वर्षांची वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. या निर्णयामुळे चालकांवर बेकारीची कुºहाड कोसळणार असून, मुंबई व ठाणे येथील चालक तीन पाळ्यांमध्ये सदर व्यवसाय करीत असतात परंतु नाशिकमध्ये एका पाळीतच हा व्यवसाय केला जातो. त्यामुळे तेथील रिक्षा, टॅक्सीशी नाशिकची तुलना करणे अयोग्य असून, नाशिकमधील रिक्षा या मुंबई व ठाण्याच्या तुलनेत चांगल्या कंडीशनमध्ये असताना व त्यांचे नादुरुस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. नाशिकमध्ये या व्यवसायात दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाने त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळण्याची शक्यताआहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन नाशिकमध्ये २५ वर्षे वयोमर्यादा करण्यात यावी, अशी मागणी हैदर सय्यद, नवनाथ लव्हाटे, हेमंत नाटकर, पप्पू पटेल, बाळासाहेब गंधे, प्रकाश हिरे, विलास रामराजे, सय्यद हुसेन, सय्यद कुतबोद्दीन, एकबाल शेख आदींनी केली आहे.