काम-क्रोधामुळे आत्मशांतीचा नाश :स्वामी स्वरुपानंद सरस्वती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 09:52 PM2017-11-07T21:52:25+5:302017-11-07T22:00:43+5:30
एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत.
नाशिक : मन शांत व क्रोधमुक्त असेल तरच तुम्हाला आत्मशांती लाभेल. शांती नाहिसी होण्यास तुमची जन्म वेळ, ठिकाण किंवा प्रारब्ध जबाबदार नाही तर तुम्ही स्वत: जबाबदार आहे. राग, द्वेषामुळे माणसाचे अध:पतन होत जाते हे भगवतगितेत भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. असे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले.
शिवशक्ती ज्ञानपिठ व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने गापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात आयोजित सुश्राव्य व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मंगळवारी (दि.७) सरस्वती यांनी गुंफले. या सात दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप यतेया रविवारी (दि.१२) होणार आहे. एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. यावेळी ते म्हणाले, राग, द्वेषामुळे भोगवासनेची निर्मिती होते आणि माणूस या भोगवासनेचा बळी ठरतो अणि स्वत:सह दुस-यांनाही त्रासाचे कारण ठरतो. माणूस हा बुध्दीवान प्राणी असून त्याला विचार करण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे पांडित्य विदवत्ता मिळविल्यानंतर माणूस स्वैराचार, भ्रष्टाचाराच्या मार्गावर का जातो ? पशुतुल्य हिंस्र प्राण्याप्रमाणे तो का वागतो? याचा शोध घेतला पाहिजे.