३५ लढाऊ वैमानिकांची तुकडी देशसेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:03+5:302021-06-06T04:12:03+5:30
नाशिक, पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे कार्यान्वित असलेल्या युध्दजन्य परिस्थितीत विमान उड्डाणाचे धडे देत लढाऊ वैमानिक घडविणारी कॅट्स देशातील महत्त्वाचे ...
नाशिक, पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे कार्यान्वित असलेल्या युध्दजन्य परिस्थितीत विमान उड्डाणाचे धडे देत लढाऊ वैमानिक घडविणारी कॅट्स देशातील महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्राला राष्ट्रपती प्रेसिडेंट कलर्स पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या केंद्रातून दरवर्षी भारतीय सैन्यात लढाऊ वैमानिक दिले जातात. शिमला सैन्य प्रशिक्षण कमांडच्या नेतृत्वाखाली या केंद्राची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
दरम्यान, केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर संजय वढेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित वैमानिकांना फ्लाइंग विंग व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत विविध प्रकारचे कठोर आव्हानात्मक हेलिकॉप्टर उड्डाणाचे टप्पे यशस्वीपणे प्रशिक्षणार्थी जवानांनी पार केले. ध्रुव, चेतक, चित्ता या तीन हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या तुकडीने धडे गिरविले. दरम्यान, अष्टपैलू कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या ‘सिल्वर चित्ता’ या मानाच्या चषकाचे मानकरी कॅप्टन अक्षय मोर हे ठरले. तसेच ग्राउंडच्या विविध विषयांमध्येही अक्षय यांनी प्रावीण्य मिळवून ‘एअर ऑब्जर्वेशन-३५’ या चषकावर स्वत:चे नाव कोरले. कमांडंट ब्रिगेडियर संजय वढेरा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्टरीत्या फायरिंग करत नैपुण्य प्राप्त करत कॅप्टन सी. वरुण बाबू यांनी ‘पी.के.गौर’ स्मृतिचषक पटकाविला. तसेच कॅप्टन निश्चल ठाकूर यांनी हवाई उड्डाणामध्ये प्रथम स्थान पटकावून ‘कॅप्टन एस. के. शर्मा’ चषक जिंकला.
---
फोटो : आरवर ०५कॅट/१/२
कॅप्शन : ०५ कॅट : अष्टपैलू कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या ‘सिल्वर चित्ता’ हा मानाचा चषक कॅप्टन अक्षय मोर यांना प्रदान करताना ब्रिगेडियर संजय वढेरा.
०५कॅट१/ सैनिकी लढाऊ विमानचालन प्रशिक्षणादरम्यान विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या लढाऊ वैमानिकांसमवेत वरिष्ठ लष्करी अधिकारी.
===Photopath===
050621\05nsk_45_05062021_13.jpg~050621\05nsk_47_05062021_13.jpg
===Caption===
कॅप्शन : ०५ कॅट : अष्टपैलू कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या ‘सिल्वर चित्ता’ हा मानाचा चषक कॅप्टन अक्षय मोर यांना प्रदान करताना ब्रिगेडियर संजय वढेरा.~अष्टपैलू कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या ‘सिल्वर चित्ता’