राज्यातआरोग्य विद्यापीठाचा बृहत आराखडा : जिल्ह्यांमध्ये प्रत्येक आरोग्यशास्त्राचे महाविद्यालय असावे
By admin | Published: October 30, 2014 11:05 PM2014-10-30T23:05:07+5:302014-10-30T23:05:23+5:30
राज्यातआरोग्य विद्यापीठाचा बृहत आराखडा : जिल्ह्यांमध्ये प्रत्येक आरोग्यशास्त्राचे महाविद्यालय असावे
१९१ वैद्यकीय महाविद्यालयांची आवश्यकतासंदीप भालेराव ल्ल नाशिक
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयार केलेल्या बृहत आराखड्यानुसार राज्यात अद्यापही १९१ वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठाने तयार केलेल्या आराखड्यानुसार वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जाहीर केले असले, तरी शासन आणि संस्थाचालकही याबाबत उदासीनच असल्याचे दिसून येते.
राज्यात वैद्यकीय शिक्षणाचे समन्याय वाटप व्हावे यासाठी दर पाच वर्षांनी विद्यापीठाकडून बृहत आराखडा तयार केला जातो. विद्यापीठाने तयार केलेल्या २०१५-१६ च्या आराखड्यानुसार राज्यात अद्यापही विविध आरोग्य विद्याशाखांची १९१ महाविद्यालये सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय शाखेची १५, दंतवैद्य शाखेची १७, आयुर्वेदाची ०८, युनानी- ३०, होमिओपॅथी- ०९, फिजिओथेरपी- २२, आॅक्युपेशनल थेरी- ३२, बी.एस्सी. नर्सिंग- ०६, पीबी बी.एस्सी. नर्सिंग- २०, तर बॅचरल आॅफ अॅडॉलॉजीची ३२ अशा १९१ वैद्यकीय महाविद्यालयांची आवश्यकता असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. ही महाविद्यालये कोणत्या जिल्ह्यात असावीत याचादेखील आराखडा तयार करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आरोग्यशास्त्राचे शाखानिहाय महाविद्यालय असावे. आदिवासी आणि मागास भागात महाविद्यालय सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काही बाबींची सूटदेखील दिली जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात पाच लाख लोकसंख्येमागे एक वैद्यकीय महाविद्यालय असावे असा निकष तयार करण्यात आला आहे. त्यानुसार संस्थाचालकांना वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत विद्यापीठाने आवाहन केले होते.
गेल्या सप्टेंबरमध्ये यासंदर्भात संस्थाचालकांचे समुपदेशन
देखील करण्यात आले होते. प्रस्ताव सादर करताना घ्यावयाची काळजी आणि त्याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्तीही करण्यात आली होती. असे असतानाही आरोग्य शिक्षण महाविद्यालये सुरू करण्याबाबत फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
(क्रमश:)