घरफोडी करणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:41 AM2018-12-16T01:41:54+5:302018-12-16T01:42:18+5:30

सटाणा तालुक्यातील नामपूर शिवारात भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला होता. नामपूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी कारभारी भाऊराव मोरे हे त्यांच्या कुटुंबीयांसह दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी सप्तशृंगगडावर दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास अज्ञात आरोपींनी कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रुपये असा एकूण ३,८३,३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

Detainee detained gang | घरफोडी करणारी टोळी अटकेत

घरफोडी करणारी टोळी अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देकारवाई : एक लाख ६१ हजारांचा ऐवज हस्तगत

नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर शिवारात भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला होता. नामपूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी कारभारी भाऊराव मोरे हे त्यांच्या कुटुंबीयांसह दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी सप्तशृंगगडावर दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास अज्ञात आरोपींनी कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रुपये असा एकूण ३,८३,३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
त्यानंतर जिल्ह्यातील वाढत्या घरफोड्या प्रकरणी पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करून तपासाकरिता सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या पथकाने तपास सुरू केला.
सटाणा तालुका परिसरातील बंद घरांवर पाळत ठेवून घरफोडी करणारे गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत व सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून गुन्हेगार धुळे जिल्ह्यातील असल्याचे समजताच धुळे शहरातील आझादनगर व अंबिकानगर परिसरात तळ ठोकून होते. दरम्यान, तेथील तिरंगा चौक परिसरात सापळा रचून घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार अकबर मुस्तकीम बागवान यास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने त्याचे साथीदार अस्लम शेख इस्माईल खाटीक ऊर्फ लाली, मोसीन इस्माईल बागवान ऊर्फ दालचावल, अस्लम ऊर्फ लाली यांना ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Detainee detained gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.