घरफोडीतील गुन्हेगार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:57 AM2019-02-06T01:57:41+5:302019-02-06T01:58:54+5:30
काही महिन्यांपूर्वी शहरात घडलेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित शंकर नागेश पुजारी (रा. शनिमंदिरामागे, पेठरोड) याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
नाशिक : काही महिन्यांपूर्वी शहरात घडलेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित शंकर नागेश पुजारी (रा. शनिमंदिरामागे, पेठरोड) याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित शंकर पुजारी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता मुंबई नाका व ओझरमधील घरफोडीची त्याने कबुली दिली आहे. दरम्यान, पथकातील कर्मचारी विशाल काठे यांना संशयित पुजारी हा पेठफाटा परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, परिसरात सापळा रचण्यात आला. ओझरमध्येही संशयित गणेश बाजीराव केदारे याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.
अट्टल गुन्हेगार; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे
संशयित पुजारी व केदार हे अट्टल गुन्हेगार असून, गेल्यावर्षी गंगापूर परिसरात केलेल्या घरफोडी प्रकरणी त्यांना आॅगस्ट महिन्यात पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून ६६ हजार रु पयांचा मुद्देमालही जप्त केला होता. तसेच तपासात संशयितांनी सरकारवाडा, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोड्यांसारखे गुन्हे केल्याची कबुली दिली होती. त्यांच्याकडून ४ लाख ३३ हजार रु पयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. संशयित पुजारी हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. त्यानंतर पुन्हा घरफोडी केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. केदारे हा अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.