इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे ग्रामस्थांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 08:32 PM2020-04-17T20:32:43+5:302020-04-18T00:27:10+5:30
सिन्नर : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या जीवघेण्या परिस्थितीत गावोगावी आशा सेविकांकडून सर्वेक्षणाचे काम करण्यात येत असून, या सेविकांना तपासणी करणे शक्य व्हावे म्हणून भोकणी ग्रामपंचायतने जिल्ह्यातील पहिले इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर उपलब्ध करून दिले आहे.
सिन्नर : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या जीवघेण्या परिस्थितीत गावोगावी आशा सेविकांकडून सर्वेक्षणाचे काम करण्यात येत असून, या सेविकांना तपासणी करणे
शक्य व्हावे म्हणून भोकणी ग्रामपंचायतने जिल्ह्यातील पहिले इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर उपलब्ध करून दिले आहे.
या स्कॅनरसाठी ग्रामपंचायतीने सुमारे ९ हजार रुपये तरतूद केली आहे. गावात सर्वेक्षण करताना आशा सेविकांना प्रत्येकवेळी व्यक्तींचे तापमान मोजावे लागते. अशावेळी कितीही काळजी घेतली तरी अनेकदा आजारी व्यक्तींशी थेट संपर्क होतो. हा संपर्क सर्व्हे करणाऱ्या सेविकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने सुरक्षित अंतरावरून शरीराचे तापमान मोजण्यासाठी सरपंच ज्योती वाघ, बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे यंत्र वापरण्यासाठी जुजबी प्रशिक्षण लागते. जे आशा सेविकांना पंचायत समिती स्तरावरील कार्यशाळेत यापूर्वीच देण्यात आले आहे.
मोठ्या रुग्णालयातच आढळणारे हे महागडे यंत्र ग्रामपंचायत स्तरावर पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. हे यंत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल या सेविकांच्या ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहे.