पेठ येथे दुचाकी चोरट्याला अटक अटक गुन्हे शाखेची कारवाई : ओझर येथील वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:26 PM2018-03-22T23:26:40+5:302018-03-22T23:26:40+5:30

पेठ : ओझर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून पेठ येथून संशयितासह हस्तगत केली.

Detention of a two-wheeler gang at Peth: The vehicle of Ozar | पेठ येथे दुचाकी चोरट्याला अटक अटक गुन्हे शाखेची कारवाई : ओझर येथील वाहन

पेठ येथे दुचाकी चोरट्याला अटक अटक गुन्हे शाखेची कारवाई : ओझर येथील वाहन

Next
ठळक मुद्देमोठे रॅकेट सापडण्याची शक्यता निर्माण तरुण जाळ्यात ओढले जात असल्याचे वास्तव

पेठ : शहरी भागातील चोरीस गेलेल्या दुचाकी आदिवासी भागातील तरुणांना विक्री करण्याचा अवैध धंदा जोर धरू पाहत असून, ओझर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून पेठ येथून संशयितासह हस्तगत केली.
पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी तालुक्यात गस्त वाढविली असून, ओझर येथून चोरी गेलेली दुचाकी (क्र. एमएच १५ एफई ३४८५) पेठ तालुक्यातील अतिदुर्गम अशा बोरधा गावातील भास्कर ढवळू राथड हा वापरत असल्याच्या गुप्त माहितीवरून तपास केला असता सध्या त्याचे वास्तव्य गुजरात राज्यातील हुडा, ता. कपराडा, जि. वलसाड येथे असल्याचे समजले. संशयित पेठ येथे कायम येत असल्याच्या माहितीवरून दबा धरून बसलेल्या सहा. पोलीस उपनिरीक्षक एस. के. पाटील, हवालदार सय्यद व पोलीस नाईक वसंत खांडवी याच्या पथकाने संशयित शहरात येताच त्यास जेरबंद केले व त्याच्या ताब्यातील दुचाकीसह ओझर पोलिसांच्या हवाली केले आहे. यामुळे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेक आदिवासी तरुण स्वस्तात गाडी मिळते म्हणून या जाळ्यात ओढले जात असल्याचे वास्तव समोर येत आहे.

Web Title: Detention of a two-wheeler gang at Peth: The vehicle of Ozar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस