गिरणारेरोडवरील दशक्रियाविधी शेडची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:12 AM2018-06-02T00:12:02+5:302018-06-02T00:12:38+5:30

गिरणारेरोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुर्दशा झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या जमिनीवरील बैठक व्यवस्था व खाली जमिनीला मोठे भगदाड पडले असून, एखाद्या नागरिकाचा पाय अडकून दुर्घटना घडू शकते, शासनाचे यावर कोट्यवधी रुपये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 Deteriorating Shade Plight on Girar Road | गिरणारेरोडवरील दशक्रियाविधी शेडची दुर्दशा

गिरणारेरोडवरील दशक्रियाविधी शेडची दुर्दशा

Next

गंगापूरगाव : गिरणारेरोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुर्दशा झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. शेडच्या जमिनीवरील बैठक व्यवस्था व खाली जमिनीला मोठे भगदाड पडले असून, एखाद्या नागरिकाचा पाय अडकून दुर्घटना घडू शकते, शासनाचे यावर कोट्यवधी रुपये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.गिरणारे दुगाव तसेच पंचक्रोशितील नागरिक याठिकाणी दशक्रि या विधीसाठी येत असतात. त्यांना विधिवत कार्यक्र मासाठी चांगली जागा म्हणून गोदावरी नदीवरील पुलाखाली शासनाच्या वतीने आमदार- खासदार निधीमधून दशक्रि या शेडची निर्मिती केली जाते, मात्र शासनाच्या गुणनियंत्रण विभाग मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची खात्री न करता त्याचे प्रमाणपत्र सढळ हाताने दिले जात असल्याचे या दशक्रि या शेडची अवस्था बघून वाटते. स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे हे शेड जेव्हा बांधण्यात आले, त्याच्या दोन-तीन महिन्याने शेडचे वरचे पत्रे उडून गेले, त्यानंतर ते पत्रे संबंधित ठेकेदाराने बसविल्यानंतर काही महिन्याने शेडच्या पायाखालची वाळू सरकून जमिनीत काँक्रीट असतानाही मोठे भगदाड पडले. कोट्यवधी रु पये अशा निकृष्ट कामामुळे वाया जात असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.
या निकृष्ट कामाचे मूल्यांकन होऊन दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. संबंधित ठेकेदार, संबंधित अधिकारी तशेच काम पूर्णत्वाचा दाखला देणारे सर्व अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई का झाली नाही? असा संतप्त सवाल गिरणारे आणि दुगावमधील नागरिकांनी केला आहे.
यासंदर्भात गिरणारे गटाच्या अर्पणा खोसकर यांच्याशी पत्रव्यवहार झाले असून, निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यावर अजून चांगल्याप्रमाणे काम करण्याचे त्यांनी सांगितले आहे. याठिकाणी गिरणारे, दुगाव, नाईकवाडी, साडगाव नागलवाडी, आभाळेवाडी आदी भागांतील नागरिक येथे दशक्रि याविधीसाठी येतात. महिलांसाठी किंवा पुरु षांसाठी कपडे बदलण्याची रूम, पाणीची वेवस्था, लाइट तसेच महिला-पुरु षांसाठी शौचालायची व्यवस्था आदी सर्व सुविधा देणार आहे.
- अनिल थेटे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

Web Title:  Deteriorating Shade Plight on Girar Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक