ंमहागठबंधनाकडून आंदोलनाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 06:51 PM2018-09-01T18:51:03+5:302018-09-01T18:51:46+5:30
आझादनगर : मनपाच्या निधीतुन शहरात झालेली विकासकामे कागदोपत्री दर्शवित लाखो रुपयांचे देयके सादर करणाऱ्यांविरुद्ध मनपा प्रशासन काय कारवाई करेल याचा खुलासा मनपाने येत्या ७ सप्टेंबर पर्यंत जाहीर न केल्यास महानगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार महागठबंधन आघाडीचे नेते माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांनी जाहीर सभेत केले आहे.

शहरातील विकासकामांबाबत झालेल्या भ्रष्टाचारांविरोधात आगामी आंदोलनाची रुपरेषा जाहीर करण्यासाठी फतेह मैदान येथे झालेल्या जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल, नगरसेवक एजाज बेग, अतिक कमाल, अमानतुल्ला पीर मोहंमद, हाजी हनीफ साबीर आदि व्यासपिठावर उपस्थित होते.
मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांनी सत्ताधारी कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या कार्यकाळात झालेल्या निकृष्ठ कामांचे दाखले देत म्हणाले की, किल्ला भागातील नोमानी पुल पहिल्याच पाण्यासोबत वाहून गेला. मिल्लत मदरशाला लागुन असलेल्या उद्यानाचे काम सुरू आहे. त्याच्या विकासासाठी ८० लाख रुपये मंजुर आहेत. मात्र दुचाकीच्या जुन्या टायरांचा वापर सुशोभीकरणासाठी करण्यात येत आहे. शहरात महागठबंध आघाडीने उघडकीस आणलेली बोगस कामांवरुन नागरिकांची दिशाभुल करण्यासाठी आमदार आसिफ शेख यांनी नगरविकास विभागाच्या सचिवांना सर्वच कामांची चौकशीचे पत्र दिले आहे अशी टिका मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांनी केली.
जनता दलाचे अध्यक्ष व महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल म्हणाले की, मनपा प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नाही. कर वसुली सक्तीच्या पद्धतीने केली जाते मात्र करातुन आलेल्या पैशांचा विनियोग बोगस कामांची बिले अदा करण्यासाठी होत आहे. अधिकाºयांचीही चौकशी करणे गरजेचे आहे. यावेळी जनता दलाचे सचिव मोहंमद मुस्तकीन डिग्निटी, नगरसेवक मसुद अहमद, सभागृहनेता कलीम दिलावर, जैनुीद्दीन पिंजारी, मौलाना अतहर हुसेन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.येत्या सोमवार पासून रात्री शहरातील विविध चौकात ‘विकास की तलाश’ बाबत पंचायत बसविण्यात येणार असल्याचेही सभेत वक्त्यांनी जाहीर केले.