निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी निधीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:41 AM2019-09-01T00:41:48+5:302019-09-01T00:42:06+5:30
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीची बैठक डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करण्याचा तसेच प्रत्येक विश्वस्ताने सव्वा लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीची बैठक डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करण्याचा तसेच प्रत्येक विश्वस्ताने सव्वा लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
काळाराम मंदिराजवळील वारकरी भवनात झालेल्या बैठकीस संस्थानचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड आणि विद्यमान अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे यांच्यासह जिल्हाभरातील दीडशेहून अधिक कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी उपस्थित होते. जीर्णोद्धार समितीच्या जिल्हा आणि प्रत्येक तालुक्यातील सदस्यांनी ५१ हजार रुपये निधी या कामासाठी देण्याचा ठरावही बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला. बैठकीस पुंडलिकरव थेटे, दामोदर महाराज गावले, जयंत महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, दत्तू पा. डुकरे, दत्ताकाका गडाख, चंदू आहेर, एकनाथ गोळेसर, श्रावण महाराज अहिरे, रामू अण्णा निफाडे, माणिकराव देशमुख, नामदेव पाटील गाढवे, विष्णू थेटे, दामोदर आव्हाड आदींचा समावेश होता.