नाशकात विद्रोही साहित्य संमेलन घेण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:35 AM2021-02-05T05:35:12+5:302021-02-05T05:35:12+5:30
नाशिक : शहरात विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेण्याचा आणि ते दिवंगत बाबूराव बागुल, लोकशाहीर वामनदादा कर्डक, कवी अरुण ...
नाशिक : शहरात विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेण्याचा आणि ते दिवंगत बाबूराव बागुल, लोकशाहीर वामनदादा कर्डक, कवी अरुण काळे यांच्या साहित्य-विचाराला समर्पित करण्याचा निर्धार विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून नाशकात झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.
मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात रविवारी (दि. ३१) विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून ज्येष्ठ कवी करूणासागर पगारे यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर कायमस्वरुपी बहिष्काराची भूमिकाही या बैठकीत अधोरेखित करण्यात आली. बैठकीत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष पुणे येथील प्रा. प्रतिमा परदेशी यांच्यसह, कार्यकारी सचिव यशवंत मकरंद, परभणीचे प्रशांत सोनुने, बुलडाण्याचे डॉ. सुरेश शेळके, हिंगोलीचे किशोर ढमाले, धुळ्यातील मोहन यशवंते, नीलेश सोनवणे, प्रा. अशोक धुळधुळे यांनीही विचार मांडताना विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आर-पार ची लढाई सुरू झाल्याचे मतही सहभागी चळवळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या बैठकीला डॉ. संजय जाधव, अर्जुन बागुल, सचिन दिवे, राजू देसले, ॲड. अनिल शालीग्राम, यशवंत दानी, मधुकर केदारे, विजया दुर्धवळे, यशवंत बागुल, राजेंद्र जाधव, नितीन भुजबळ, ताराचंद मोतमल, आदी उपस्थित होते.
(आरफोटो-३१ विद्रोही साहित्य संमेलन) - विद्रोही सांस्कृतिक चळवळीविद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बैठकीला उपस्थित ज्येष्ठ कवी करूणासागर पगारे यांच्यासह प्रा. प्रतिमा परदेशी, यशवंत मकरंद, प्रशांत सोनुने, डॉ. सुरेश शेळके, किशोर ढमाले, मोहन यशवंते, नीलेश सोनवणे, प्रा. अशोक धुळधुळे, आदी उपस्थितो होते.