विंचूर गाव बंद न करण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:06 PM2018-09-30T17:06:04+5:302018-09-30T17:09:31+5:30

विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान शुकशुकाट असतो. अखेर या बंदला हैराण झालेल्या विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. गावात बंद करायचा असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी तसेच बंदचा निर्णय योग्य वाटल्यास दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

The determination not to stop the village of Vinchur | विंचूर गाव बंद न करण्याचा निर्धार

विंचूर गाव बंद न करण्याचा निर्धार

Next
ठळक मुद्देव्यापारी असोसिएशन : गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला निवेदन

विंचूर: देशात, राज्यात अथवा जिल्ह्याच्या गल्लीबोळात काही अप्रिय घटना घडली की गावात बंद पुकारावा.. अनेक वर्षांपासूनचा हा इथला अलिखित नियम... अनेकदा शेजारच्या गावांमध्ये सुरळीत व्यवहार सुरू असताना विंचूर येथील बाजारपेठा व मुख्य रस्त्यांवर बंदमुळे भयान शुकशुकाट असतो. अखेर या बंदला हैराण झालेल्या विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन साकडे घालण्यात आले. गावात बंद करायचा असल्यास त्याची पूर्वसूचना द्यावी तसेच बंदचा निर्णय योग्य वाटल्यास दुपारी १२ वाजेपर्यंतच प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या विंचूरची कांदा मार्केटमुळे तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणून नव्याने ओळख निर्माण होऊ लागली आहे. पंचक्र ोशीतील गावे व वाड्या-वस्त्यांमुळे येथील बाजारपेठेत दिवसभर छोटी-मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते. तसेच नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील गाव असल्याने शिर्डी, नाशिककडे जाणारी लांब पल्ल्याची खासगी वाहने रस्त्यालगत असलेल्या दुकाने, हॉँटेलमध्ये नास्ता करण्यासाठी थांबत असल्याने वर्दळ सुरू असते. असे असले तरी व्यापाऱ्यांना नियमित दोन-तीन महिन्यांत होणाºया गाव बंदच्या निर्णयामुळे वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गावातील दुकानदारांना सकाळी अचानक अमुक कारणामुळे गाव बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. अथवा अगोदर रात्री बंदचा फलक तीनपाटीलगत लावला जातो. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील व्यापाºयांचे म्हणणे आहे. विशेष घटना अथवा योग्य कारण असल्यास आम्ही गाव बंदसाठी सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र राज्याच्या कानाकोपºयात कुठेतरी अप्रिय घटना घडते अथवा काही योग्य कारण नसतानाही अनेकदा ऊठसूट गाव बंद निर्णयामुळे सर्व दुकानदार हैराण झाले असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. अनेकदा अचानक गाव बंद ठेवल्यामुळे हॉटेल चालकांनी अगोदर घेतलेले दूध अथवा इतर पदार्थ दुसºया दिवशी खराब होत असल्याने अन्नपदार्थाच्या खराबीमुळे नाहक आर्थिक नुकसान अनेकदा सहन करावे लागल्याचे येथील हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. काही अघटित घटना अथवा सार्वत्रिक बंदमध्ये लासलगावात बंद पाळल्यास दुपारनंतर दुकाने सुरू केली जातात. येथे मात्र दिवसभर बंद पाळावा लागत असल्याने अखेर संयम सुटलेल्या येथील व्यापारी वर्गाने याचा निषेध करीत पोलीस प्रशासनास निवेदन दिले. तसेच ग्रामपालिकेत याबाबत ठराव करण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.
देश-विदेशात काहीही घटना, दुर्घटना घडली असता व्यापाºयांनी आपले व्यवसाय बंद ठेवावे असे सांगण्यात येते. यानंतरच्या काळात ज्या संघटना किंवा ज्या घटकांना गावात बंद करावयाचा असेल त्यांनी विंचूर पोलीस स्टेशन व विंचूर व्यापारी असोसिएशन यांना एक दिवस आधी लेखी माहिती कळवावी. त्यानंतर कारण योग्य वाटल्यास असोसिएशनच्या वतीने त्यावर निर्णय घेण्यात येऊन गाव बंद ठेवण्यात येईल. तसेच व्यापार-व्यवसाय दुपारी १२ वाजेपर्यंतच बंद ठेवण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन पोलीस प्रशासन व ग्रामपालिकेस व्यापारी वर्गाने दिले.
 

Web Title: The determination not to stop the village of Vinchur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.