ग्रामस्थांच्या निर्धाराने अभोणा झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:18+5:302021-06-19T04:10:18+5:30

अभोणा : ''गाव करी ते राव काय करी,'' याचा प्रत्यय अभोणा येथे आला आहे. सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या ...

With the determination of the villagers, Abhona became free from corona | ग्रामस्थांच्या निर्धाराने अभोणा झाले कोरोनामुक्त

ग्रामस्थांच्या निर्धाराने अभोणा झाले कोरोनामुक्त

Next

अभोणा : ''गाव करी ते राव काय करी,'' याचा प्रत्यय अभोणा येथे आला आहे. सुमारे सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने शासनाने राबविलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून संपूर्ण गाव कोरोना मुक्त झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गेल्या एक महिन्यापासून येथे कोरानाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती सरपंच सुनीता पवार, उपसरपंच भाग्यश्री बिरार व ग्रामविकास अधिकारी जिभाऊ जाधव यांनी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च-एप्रिलदरम्यान गावात जवळपास १००वर कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे भीतीचे वातावरण होते. कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी ग्रामपालिका प्रशासन, ग्रामस्थ, व्यापारी बांधव यांची बैठक होऊन कोणत्याही परिस्थितीत कोरोना आटोक्यात आणण्याचा सर्वांनी निर्धार केला. एकदिलाने गावात आठवड्याचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. त्याच बरोबर संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराइड औषध फवारणी, घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी, अँटिजन चाचणी, लसीकरण यांसह विविध उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला. या सर्व कालावधीत गावातील शिक्षक, आरोग्य सेवक-सेविका, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांनी रुग्णांचा शोध घेऊन ओषधोपचार करण्यात आले. यादरम्यान सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना, तहसीलदार बी.ए. कापसे, बी.डी.ओ. बहिरम, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुधीर पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शहर परिसरात विलगीकरण कक्ष तयार करण्यात येऊन अतिजोखमीच्या रुग्णांना तेथे ठेवण्यात आल्याने गावात संसर्ग रोखण्यात मदत झाली. लग्नसोहळे व सार्वजनिक कार्यक्रम बंद करून शासन व

ग्रामपालिकेने लागू केलेल्या नियमांचे ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत काटेकोर पालन केले. यामुळे येथे कोरोना शून्यावर आला.

-----------------------

गावात कोरोना शून्यावर आला असला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी

गर्दी करून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास हातभार लागणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. सर्वांनी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले. तसे यापुढेही कराल, अशी अपेक्षा आहे.

-जिभाऊ जाधव, ग्रामविकास अधिकारी (१७ जिभाऊ जाधव)

------------------------------

सर्वांच्या सकारात्मक प्रयत्नाने कोरोनाशी आम्हाला लढा देता आला. कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले. म्हणूनच गावात कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यात यश आले. हीच एकजूट यापुढे ठेवत तिसऱ्या संभाव्य लाटेला गावाच्या वेशीवरूनच परतवूया. -सुनीता पवार, सरपंच, अभोणा (१७ सुनीता पवार)

===Photopath===

170621\103317nsk_2_17062021_13.jpg

===Caption===

१७ सुनीता पवार, १७ जिभाऊ जाधव

Web Title: With the determination of the villagers, Abhona became free from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.