पाणीप्रश्नी जनजागृतीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:32 AM2018-03-03T00:32:50+5:302018-03-03T00:32:50+5:30
पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही वळण पद्धतीने पूर्व वाहिनी करून त्रूटीच्या गिरणा खोºयात हक्काचे पाणी मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीची बैठक माजी आमदार शांताराम अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वांजूळ पाणीप्रश्नी कसमादे परिसरात जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.
मालेगाव : पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही वळण पद्धतीने पूर्व वाहिनी करून त्रूटीच्या गिरणा खोºयात हक्काचे पाणी मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीची बैठक माजी आमदार शांताराम अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वांजूळ पाणीप्रश्नी कसमादे परिसरात जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे. कसमादेना तालुक्यातील जनता जोपर्यंत पेटून उठत नाही तोपर्यंत या मागण्या मंजूर होणार नाहीत, त्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती करीत एप्रिल महिन्यात आंदोलन उभारावे लागेल, असे आवाहन माजी आमदार अहेर यांनी केले. आजपर्यंत आपण अनेक आंदोलने केली. परंतु आंदोलनात अपेक्षित प्रतिसाद या योजनेबाबत नसलेल्या माहितीमुळे मिळत नसून हे प्रश्न आजही जसेच्या तसे आहेत. राजकीय नेत्यांकडून प्रशासनावर दबाव टाकून आंदोलनाची गळचेपी करण्यात येत आहे, असा आरोप माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वास देवरे यांनी यावेळी केला. वांजूळ पाणी प्रश्नावर गावागावात प्रमुख लोकांना व तरुणांची १ ते ३० मार्चदरम्यान भेट घेत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. के. एन. अहिरे यांनी दिली. यानंतर मालेगाव येथे बैठक घेतली जाईल व त्यानंतरच एप्रिल महिन्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही प्रा. अहिरे यांनी सांगितले. अॅड. शिशिर हिरे, निखिल पवार, देवा पाटील, शेखर पगार यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीस कुंदन चव्हाण, भाऊसाहेब पगार, जितेंद्र अहिरे, विवेक वारूळे, रविराज सोनार, वीरेंद्र निकम, अभिमन पवार, मिलिंद पगार, सोमनाथ जगताप, चिंतामण निकम, शंकर बच्छाव, अशोक थोरात, राधाकिसन खैरनार, गणी शाह, यांच्यासह देवळा, बागलाण, मालेगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.