गाव व्यसनमुक्त करण्याचा महिला सरपंचाचा निर्धार
By admin | Published: January 29, 2017 01:06 AM2017-01-29T01:06:51+5:302017-01-29T01:07:09+5:30
तळवाडे : ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव संमत
सायखेडा : निफाड तालुक्यातील दक्षिणेकडील सीमेवर असलेले पंधराशे लोकसंख्येचे तळवाडे गाव महिला सरपंच लता सांगळे यांच्या पुढाकाराने शंभर टक्के व्यसनमुक्त करण्याचा मानस व्यक्त केला आहे. प्रजासताक दिनाच्या दिवशी तळवाडे येथे ग्रामसभेत गाव व्यसनमुक्त होण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. गावात दारूबंदी, गुटखा-तंबाखूबंदी, लग्नाची वरात बंदी, आदि विविध ठराव मांडले. सरपंच सांगळे यांनी आणि ग्रामसभेनी ठराव तत्काळ मंजूर दिली. व्यसनमुक्ती मागणीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी गावात दारू विक्र ी, गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच गावात दारू पिऊन येणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपये दंड व गावातील महिला त्रास होतो म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असे महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत करण्यात आले, या ठरावाची योग्य अमलबजावणी योग्य प्रकारे झाली तर निफाड तालुक्यातील शंभर टक्के व्यसनमुक्त होणारे गाव म्हणून तळवाडेची ओळख होणार आहे आणि यासाठी महिला सरपंचाचा पुढाकार असणार आहे. (वार्ताहर)