राज्यस्तरावर चांगली उपकरणे पाठविण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 03:58 PM2019-01-04T15:58:53+5:302019-01-04T16:00:13+5:30
चिंचोली : सहविचार सभेत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनावर चर्चा सिन्नर : येत्या १६ जानेवारीपासून सिन्नर तालुक्यातील चंचोली येथील प्रवरा रुलर कॅम्पस्मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन करण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचोली : सहविचार सभेत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनावर चर्चा
सिन्नर : येत्या १६ जानेवारीपासून सिन्नर तालुक्यातील चंचोली येथील प्रवरा रुलर कॅम्पस्मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन करण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी २०१८-१९ या वर्षातील जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन चिंचोली येथील प्रवरा रूलर कॅम्पस येथे १६ ते १८ जानेवारी २०१९ आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे नियोजन व पूर्व तयारी यासाठी जिल्हा स्तरीय अध्यापक विज्ञान संघ व माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख, तालुका विज्ञान अध्यापक संघ यांची सहविचार सभा पार पडली.
एस. बी. देशमुख यांनी या प्रदर्शनासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, राज्यमंत्री दादा भुसे, अहमदनगराच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखेपाटील, नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, यतिन पगार, आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार, सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार हे उपस्थित रहाणार असून व जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन आपला वेगळा ठसा उमटविणार असल्याचे सांगितले.
या जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील पंधरा हजाराहून अधिक विज्ञान प्रेमी पालक, शिक्षक व विदयार्थी हजेरी लावणार असल्याचे संयोजकानी सांगितले.
सहविचार सभेसाठी आयोजक प्रवरा रूलर कॅम्पसचे प्राचार्य के. टी. व्ही रेड्डी, जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष डी. यु. अहिरे , राज्य उपाध्यक्ष राज्य विज्ञान महामंडळ दिनेश पवार, कार्याध्यक्ष विज्ञान संघ वाय. आर. पवार, सहअध्यक्ष पुरूषोत्तम रकिबे, कार्यवाह विनीत पवार, सहकार्यवाह गोकुळ चव्हाण, विज्ञान प्रदर्शन समन्वयक के. एस. तांबे, उपाध्यक्ष एन. एन. खैरणार, उपाध्यक्ष संग्राम करंजकर, व्ही. ए.डोके, दादाजी अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष एस. टी. पांगारकर, जिल्हा कार्यवाह सुनील भामरे, तालुका अध्यक्ष कल्पेश चव्हाण, तालुका कार्यवाह आर, टी. गिरी, तालुका उपाध्यक्ष एस. एस. गाडेकर, तालुका
कार्याध्यक्ष योगेश जाधव, जिल्हा प्रतिनिधी आर. आर. महात्मे, जिल्हा सदस्य किशोर जाधव आदी उपस्थित होते.