़़़़अखेर तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:47 AM2018-11-21T00:47:34+5:302018-11-21T00:47:51+5:30

अपघाताचा हॉटस्पॉट असलेल्या दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवरील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत़ महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) गतिरोधक बसविण्याचे काम करण्यात आले़

Detroit on Akhair Tarawalnagar Chafuli | ़़़़अखेर तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक

़़़़अखेर तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातावर नियंत्रण : बेफाम वाहनांना लागणार ब्रेक, जीवितहानी टळणार

पंचवटी : अपघाताचा हॉटस्पॉट असलेल्या दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवरील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत़ महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) गतिरोधक बसविण्याचे काम करण्यात आले़ या ठिकाणच्या अपघातांवर नियंत्रणासाठी गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी लोकमतने उचलून धरली होती़ तसेच तारवालानगर चौफुली मृत्यूचा सापळा बनल्याचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात
येऊन त्याचा वारंवार पाठपुरावा केला होता.
तारवालानगर चौफुलीवर बेफाम येणाऱ्या वाहनांची गती कमी व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने गतिरोधक बसवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलीस व मनपा प्रशासनाकडे केली होती. या चौफुलीवर लहान-मोठे अपघात हे नित्याचेच झाले होते़ या चौफुलीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असली तरी रात्रीच्या सुमारास किंवा पहाटेच्या वेळी भरधाव वाहन नेण्याच्या प्रयत्नात दुचाकी वा चारचाकी वाहने एकमेकांवर आदळून अपघाताच्या घटना घडल्याचे या ठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या होत्या़ या ठिकाणी झालेल्या अपघातात आतापर्यंत काहींना हकनाक जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहे.
तारवालानगर चौफुलीवर प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केलेली असली तरी दिवसा वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना दिसायचे़ मात्र वाहतूक पोलिसांची पाठ फिरताच वाहनचालक उघडपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत होते.

Web Title: Detroit on Akhair Tarawalnagar Chafuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.