देव हिरे यांचा फलक रेखाटनाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:53+5:302021-08-22T04:16:53+5:30

चांदवड : तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी शालेय ...

Dev Hiray's panel drawing record | देव हिरे यांचा फलक रेखाटनाचा विक्रम

देव हिरे यांचा फलक रेखाटनाचा विक्रम

googlenewsNext

चांदवड : तालुक्यातील भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून १७०१ चित्रमय फलक रेखाटन करण्याचा विक्रम केल्याबद्दल भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या पुरस्काराचे सन्मानपत्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व आमदार डॉ. राहुल आहेर, केदा आहेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन १९९५ पासून कार्यरत असलेल्या कलाशिक्षक हिरे यांनी सुमारे १७०१ पेक्षा जास्त विविध सामाजिक संदेश व जनजागृतीपर चित्रमय फलक रेखाटने शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडूद्वारे काढले आहेत. यावेळी शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, मधुसूदन गायकवाड, मुख्याध्यापक आर.डी. जाधव, पर्यवेक्षक कृ.बा. लोखंडे उपस्थित होते.

------------------------------------------------------

21एम.एम.जी.1-चांदवड तालुक्यातील देव हिरे यांनी शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या साह्याने चित्रमय फलक रेखाटन केल्याने त्याची नोंद भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याने त्यांचा सत्कार करताना डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, केदा आहेर व मान्यवर.

210821\21nsk_3_21082021_13.jpg

२१ एमएमजी १

Web Title: Dev Hiray's panel drawing record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.