तृतीय पंथियांनी जपली देवदिवाळीची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:50 PM2019-11-28T12:50:16+5:302019-11-28T12:50:24+5:30
वणी : देवदिवाळीच्या दिवशी जगदंबा मंदीर परिसरात गेल्या वीस वर्षापासुन हजारो दीप प्रज्वलित करु न मुंबईच्या तृतीय पंथीयांनी परंपरा जपली आहे.
Next
वणी : देवदिवाळीच्या दिवशी जगदंबा मंदीर परिसरात गेल्या वीस वर्षापासुन हजारो दीप प्रज्वलित करु न मुंबईच्या तृतीय पंथीयांनी परंपरा जपली आहे. मुंबई येथील गोरेगाव भागातील तृतीयपंथीय गेल्या वीस वर्षापासुन जगदंबा देवी मंदीरात देविदवाळीस येतात. मंदीराच्या संपूर्ण परिसरात व जगदंबा देवीच्या दर्शनी भागात दीप प्रज्वलन करतात. देवीला नवैद्य, विशेष सजावटीचा फुलांचा हार व पुजाविधीचे साहित्य सोबत आणतात. जगदंबेची मनोभावे पुजा करतात. आरती करण्यात येते. जगदंबा देवी मंदीर परिसरातील गणपती मंदिर व महादेव मंदीर, संतोषी माता मंदीर या ठिकाणी दिप प्रज्वलन करु न हा उत्सव साजरा करण्यात आला.