‘देवराई’ने नाशिककरांवर होईल निसर्ग प्रसन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:49 AM2019-02-17T00:49:34+5:302019-02-17T00:50:37+5:30
नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत
संजय पाठक, नाशिक: महापालिकेचा उद्यान विभाग म्हणजेच घोटाळेबाज, वृक्ष लागवड नव्हे वृक्षतोड समिती अशी आजवर असलेली संकल्पना मोडीत काढून नाशिक महापालिकेने यंदा प्रथमच देवराई आणि अन्य प्रकल्पांचा धडाका करीत सुखद धक्का दिला आहे. महापालिका इतके चांगले काम या क्षेत्रात करेल या विषयी शंका नसली तरी आता मात्र नवीन विकास आराखड्यातील वाढते रहीवासी क्षेत्र बघता शहरातील वनराई कशी टिकेल, असा प्रश्न आहे.
नाशिक महापालिकेचा उद्यान विभाग आजवर केवळ घोटाळ्यांनी गाजला आहे. कारंजा किंवा उद्यानातील कामे शांतपणे करण्याची बाब असताना अतितातडीची काम म्हणून उद्यान विभागाच्या कारभाऱ्यांनी कोटेशन मागवून कामे केली ती त्यांना नंतर खूपच महागात पडली. परंतु केवळ उद्यान विभागाच केवळ वृक्षाला मारक आहे, असे नाही. महापालिकेने रस्ते तया करताना इतकी वृक्षतोड केली की, पर्यावरण प्रेमींना महापालिकेचे वावडे वाटू लागले. बरेतर वृक्ष तोड केली तर प्रमाणानुसार झाडे लावणे देखील नाही. त्यामुळे शहरात नाराजीचे वातावरण होते. परंतु गेल्यावर्षीपासून महापालिकेत वेगळेच वातावरण दिसु लागले आहे. गेल्या नऊ वर्षापासून महापालिकेचा पुष्पोत्सव खोळंबला होता, परंतु यंदा ब्रेक के बाद हा महोत्सव सुरू होत आहे.
नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत त्यामुळे महापालिकेने आता ग्रामीण भागात असलेला देवराई प्रकल्प साकारण्यास सुरूवात केली आहे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून महाराष्टÑात वनसंपदा निर्माण करणाºया अभिनेते सयाजी शिंदे यांची त्यांना साथ मिळाली आहेत. परंतु शेखर गायकवाड, जसबिरसींग यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमी संस्थाची जोड मिळाली आहे. सध्या सहा ठिकाणी देवराई साकारली असून आत्ता सर्व प्रभागात हा प्रकल्प साकारण्यासाठी नगरसेवकांची देखील मागणी होत आहे. नाशिक प्राथमिक स्तरावर देवराई साकारली तर आहेच परंतु देवाचे कार्य म्हणून नाशिककरांची साथही मिळणे अपेक्षीत आहे. भविष्यात या प्रकल्पांचे सवंर्धन लोकांच्या हाती आहे. परंतु आता ्रकिमान तर चांगली झाली आहेच, त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे आणि उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले यांचे कौतुक करणे आलेच!