देवळाली कॅम्पला महिलांसाठी ‘धोबीघाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 04:31 PM2019-03-16T16:31:43+5:302019-03-16T16:33:32+5:30

देवळाली कॅम्प : परिसरातील हाडोळा हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा आणि अरुंद गल्लीबोळांचा असल्याने महिलांना कपडे धुण्यासाठी पुरेशी जागा ...

DevBali Camps for women 'Dhobighat' | देवळाली कॅम्पला महिलांसाठी ‘धोबीघाट’

देवळाली कॅम्पला महिलांसाठी ‘धोबीघाट’

googlenewsNext

देवळाली कॅम्प : परिसरातील हाडोळा हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा आणि अरुंद गल्लीबोळांचा असल्याने महिलांना कपडे धुण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वॉर्ड क्रमांक एकमधील परिसरात सार्वजनिक धोबीघाट बांधण्यात आला आहे. या धोबीघाटमुळे महिलांसाठी सुविधा झाली आहेच यामुळे सामाजिक एकोपा निर्माण होण्यासदेखील मदत होणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत असलेल्या वॉर्ड क्रमांक एकमधील हाडोळा हा अत्यंत जुना आणि मोठा परिसर आहे. या ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे महिलांना कपडे धुण्यासाठी मोठी अडचण होत असल्याची बाब अनेकदा समोर आली होती. येथील नागरिकांनीदेखील याबाबतची तक्रार केली होती. या मागणीचा विचार करून महिलांसाठी सार्वजनिक धोबीघाटाची निर्मिती करण्यात आल्याने महिलावर्गाची मोठी सोय झाली आहे.
येथील हाडोळा भागात अगदी अरु ंद गल्ल्या असल्यामुळे प्रत्येकाला धुणे धुण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे महिलांना रस्त्यावर कपडे धुणे भाग पडत होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रभावती धिवरे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत धोबीघाट उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाने दोन लाख रुपये निधी उपलब्ध करून देत मस्जिद स्ट्रिटवरील सार्वजनिक शौचालयालगत असलेल्या सुमारे ७ फूट लांब व २५ फूट रु ंद पडीक जागेत एकाच वेळी पाच महिला कपडे धुऊ शकतील, अशी व्यवस्था करून दिली आहे.
याठिकाणी पाण्याचा नळ, कपडे धुण्यासाठी आवश्यक असलेला दगडदेखील बसवून देण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील समस्या मार्गी लागल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: DevBali Camps for women 'Dhobighat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.