देवळे पुलाला भगदाड

By admin | Published: July 15, 2017 01:04 AM2017-07-15T01:04:44+5:302017-07-15T01:04:57+5:30

घोटी : घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाचा मलबा रात्री अवजड वाहनांमुळे कोसळला. या पुलाला मोठे भगदाड पडले

Devele bridge breakthrough | देवळे पुलाला भगदाड

देवळे पुलाला भगदाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : घोटी-सिन्नर मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाचा मलबा रात्री अवजड वाहनांमुळे कोसळला. या पुलाला मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक आज सकाळपासून पूर्णपणे बंद करण्यात आली
आहे. या मार्गावरील वाहतूक साकूर फाटा व मुंढेगाव मार्गे वळविण्याच्या निर्णय महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अवघ्या पंधरा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पूल जीर्ण झाल्याने चारच महिन्यांपूर्वी या पुलाच्या दुरुस्ती चे काम करण्यात आले होते. मात्र हे काम अर्धवटआणि निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता. अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सदर पूल बंद करण्यात यावा याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते.  याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध करून पूल धोकादायक झाला असल्याची जाणीव सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि शासनाला करून दिली होती. वेळीच दखल न घेतल्याने अखेर गुरुवारी मध्यरात्री या पुलाचा मध्यभागावरील मलबा कोसळून पुलाला मोठे भगदाड पडले आहे. या घटनेची कल्पना आल्याने वाहनचालकांनी पोलिसांना आणि तहसील विभागाला कळविले. आज सकाळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, नायब तहसीलदार संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता  आव्हाड, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी पुलाची पाहणी करीत पूल वाहतुकीसाठी बंद  करण्याचे आदेश दिले. तसेच सिन्नरकडील वाहतूक साकूर फाटा, तर घोटीहून जाणारी वाहतूक मुंढेगाव मार्गे वळविण्यात आली आहे.
उपअभियंत्यांचा अजब उपाय
देवळे पुलाचा मलबा कोसळून भगदाड पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी राहुल पाटील व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे पथक पुलाची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. सकाळी घटनेची माहिती समजूनही सार्वजनिक बांधकामचे अधिकारी विलास आव्हाड दुपारी १२ वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित असलेल्या नागरिकांनी व अधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आव्हाड यांनी असमर्थनीय उत्तरे देत, या पुलाशेजारील व सध्या पाण्याखाली असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून वाहतूक सुरू करणार असल्याचे स्पष्ट केल्याने अधिकाऱ्याच्या या उत्तरावर सर्वांनी संताप व्यक्त केला. ब्रिटिशकालीन पूल दाखवा असे आव्हान माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांनी केल्यानंतर मात्र उपभियंत्यांची भंबेरी उडाली.


 

Web Title: Devele bridge breakthrough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.